Crime News : एका अशा सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला, ज्यात फेक वेबसाइट तयार करून तरूणांना 'प्ले बॉय' बनवण्याच्या नावावर त्यांची फसवणूक केली जात होती. रजिस्ट्रेशन आणि अॅडव्हांसमध्ये हॉटेल चार्जच्या नावावर फसवणूक केली जात होती. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली तेव्हा याचा खुलासा झाला. पोलिसांनी सांगितलं की, या गॅंगचा मुख्य अर्पित कुमार आहे. अर्पित हाच फेक वेबसाइट तयार करत होता आणि मग तरूणींचे फोटो लावून फेक प्रोफाइल तयार करत होता. यानंतर बिहारसहीत इतर राज्यांमध्ये प्ले बॉय बनण्यासाठी जाहिरातही देत होता.
मंगळवारी पत्रकार नगरमधून अर्पित कुमारचे दोन सहकारी निशांत कुमार आणि अविनाश कुमार यांना वाहन चेकिंग दरम्यान अटक करण्यात आली. त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी अर्पित कुमारला शोधण्यासाठी छापेमारी केली. असं सांगितलं जात आहे की, गेल्या दोन वर्षात अर्पित आणि त्याच्या ग्रुपने दोनशेपेक्षा जास्त तरूणांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडे मिळालेल्या मोबाइल नंबरमध्ये दर महिन्यात 30 ते 40 ट्रान्झॅक्शनचे पुरावे मिळाले आहेत. एका तरूणाकडून ही गॅंग 30 ते 40 हजार रूपयांची फसवणूक करत होता.
चौकशीतून समोर आलं की, अविनाश आणि निशांत दोघेही पदवीधर आहेत. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून अर्पितच्या संपर्कात आहेत आणि राजधानी पटणामध्येच राहतात. त्यांनी भाड्याने एक घर घेतलं होतं. चौकशी दरम्यान दोघांनी पोलिसांना सांगितलं की, अर्पित प्रोफाइल तयार करण्यासाठी दहापेक्षा जास्त मोबाइल ठेवत होता. तरूणीचा फोटो लावून प्रोफाइन तयार केल्यावर दोनशेपेक्षा जास्त फ्रेन्ड रिक्वेस्ट लगेच येत होत्या.
दिलेल्या नंबरवर जे लोक फोन करत होते, त्यांना फसवून दिल्ली, मुंबईसहीत इतर महानगरांमध्ये महिलांसोबत संपर्क करून देण्याचं सांगण्यात येत होतं. तरूणांना सांगितलं जात होतं की, एका श्रीमंत महिलेसोबत तुमची मैत्री करून दिली जाईल. यासाठी तुम्हाला ब्लड ग्रुप, आधार कार्डसोबत फोटो द्यावा लागेल. तुम्हाला केवळ एकदा रजिस्ट्रेशन फी आणि हॉटलेचा खर्च द्यावा लागेल. पण त्यानंतर काहीच पैसे द्यावे लागणार नाहीत.
फसवलेल्या तरूणांसोबत फेक सिम कार्डवरून संपर्क केला जात होता. हैराण करणारी बाब ही की, फोनवर बोलण्यासाठी बंगालहून फेक आयडीवरून आणि 15 ते 20 हजार रूपये जमा करून सिम कार्ड कुरिअरने मागवले जात होते. दोन ते तीन तरूणांना संपर्क केल्यावर हे सिम कार्ड तोडून फेकलं जात होतं. पोलीस आता त्यांचे बॅंक अकाऊंट चेक करत आहे.