लखनौ : पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या पतीलाच मैनपुरी येथील पोलिसांनी बेदम मारहाण व अनन्वित छळ केल्याचा अमानुष प्रकार घडला आहे.याप्रकरणी मैनपुरी पोलीस ठाण्याचा मुख्य अधिकारी राजेशपाल सिंह व दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी निलंबित केले आहे. पतीला मारहाणकरण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.त्याची गंभीर दखल घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे की, ही घटना पोलिसांना एका टष्ट्वीटद्वारे कळविण्यात आली. त्याची तातडीने दखल घेऊन चौकशीची चक्रे वेगाने फिरली.छळकरणाºया पोलिसांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मैनपुरी हा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यांचा लोकसभा मतदारसंघ आहे.पीडित महिला व तिचा पती दुचाकीवरून मैनपुरीला चालले होते. त्यावेळी कारने चाललेल्या काही समाजकंटकांनी या दोघांचा पाठलाग करून त्यांना अडविले. पतीला धमकावून व त्याच्या डोळ्यात कसलीशी पूड टाकून महिलेचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने ही महिला एके ठिकाणी जखमी अवस्थेत आढळून आली. ज्यावेळी पीडित महिलेचा पती शुद्धीवर आला, तेव्हा त्याने तात्काळ पोलिसांना हेल्पलाईनवर दूरध्वनी केला. (वृत्तसंस्था)खोटी तक्रार केल्याचा कांगावापोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पतीलाच दरडावायला सुरुवात केली. खोटी तक्रार दिल्याचा आरोप करून त्याला पोलिसांनी बेदम मारहाणकेली.त्यात त्याची दोन बोटे तुटली आहेत. त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात येऊन सारा प्रकार सांगताच तिची तक्रार दाखल करून घेण्यातआली.
बलात्काराची तक्रार करण्यास गेलेल्या व्यक्तीलाच मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 5:38 AM