Crime News: काकी हैवान झाली! एड्स असताना १५ वर्षांच्या पुतण्यासोबत ठेवले शरीर संबंध; उत्तराखंड हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 12:47 PM2022-04-05T12:47:17+5:302022-04-05T12:48:06+5:30
hiv positive woman sex with nephew: ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. या महिलेने वयात आलेल्या अल्पवयीन पुतण्याला फूस लावून हा अमानवी प्रकार घडवून आणला आहे.
उत्तराखंडमध्ये नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. एका २३ वर्षांच्या महिलेने अल्पवयीन पुतण्यासोबत शरीरसंबंध ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे ती एड्सने संक्रमित आहे. काही महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचा एड्समुळे मृत्यू झाला होता. पुतण्याला एड्सबाधित करण्याचा तिचा कट होता.
ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. या महिलेने वयात आलेल्या अल्पवयीन पुतण्याला फूस लावून हा अमानवी प्रकार घडवून आणला आहे. या पुतण्याचे वय १५ वर्षे आहे. त्यालाही एड्स संक्रमित करायचे होते, यामुळे काकीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
जेव्हा त्या पुतण्याला काकी देखील एड्सबाधित असल्याचे समजले तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने झालेल्या प्रकाराची माहिती घरच्यांना सांगितली. यानंतर याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
ही महिला दुसऱ्या गावात राहते. एकदा ती पुतण्याच्या गावी आली होती. तेव्हा तिने त्याला आपल्या जाळ्यात ओढून शरीर संबंध ठेवले. यानंतर काही दिवसांनी पुतण्याचे कुटुंबीय तिच्या गावी गेले होते. तेव्हा देखील तिने त्याला तिथून थोडे दूर नेत शरीर संबंध ठेवले. यानंतर त्या पुतण्याला काकी एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे समजले.
टाइम्स ऑफ इंडियानुसार, महिलेने मुलाचे आयुष्य बरबाद करण्याची नियत ठेवून हे सर्व केले आहे. पोलिसांनी मुलाची वैद्यकीय चाचणी केली आहे.