मुंबई : मुंबईमध्ये अल्पवयीनांवरील पोक्सो न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना अल्पवयीन मुलीचा एकदा हात पकडणे आणि प्रेमाची कबुली देणे या लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीमध्ये येत नसल्याचे म्हटले आहे. (case of sexual intimation towards a minor, the POCSO court acquitted a 28-year-year old man on grounds that holding a minor’s hand and professing love to her did not amount to sexual harassment.)
प्रकरण 2017 सालचे आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका 28 वर्षीय तरुणाने प्रपोज केला होता. यावेळी त्या तरुणाने तिचा हात पकडला होता. या मुलीच्या तक्रारीवरून तरुणाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोक्सो न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
न्यायालयाने सांगितले की, आरोपीने जेव्हा तिचा हात पकडलेला तेव्हा त्याच्या मनात यौन उत्पीडन (लैंगिक शोषण किंवा अत्याचार) चा कोणताही विचार होता, याचा काही पुरावा नाहीय. याचबरोबर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याच्या इराद्याने देखील हा गुन्हेगारी प्रकार केल्याचा कोणताही पुरावा नाही. यामुळे आरोपीला बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून सोडून देण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. (Holding Minor girl's Hand, Professing Love is Not Sexual Harassment, Rules POCSO Court, Acquits 28-Yr-Old)