शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पैशांच्या मोहापायी 'त्या' चौघांचा अनैतिक कृत्यात सहभाग; घराच्या जिन्यात लपून करायचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 8:19 AM

नगरमधील हनीट्रॅप: याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महेश बागले आणि सागर खरमाळे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत

अहमदनगर : जखणगाव येथील हनीट्रॅप करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर यातील आरोपींची अनैतिक कृत्ये समोर आली आहेत. पैशांचा हव्यास आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या तरुणांना हेरून या महिलेने स्वत:ची एक टोळीच तयार केली होती. बंगल्यात आलेल्या पुरुषांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना दमदाटी व मारहाण करत पैसे उकळणे, अशी जबाबदारी या तरुणांवर होती.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महेश बागले आणि सागर खरमाळे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अमोल मोरे याचे केडगाव चौकात किराणा दुकान असून तो आरोपी महिलेचा खास पंटर आहे. सचिन खेसे याचेही नगर तालुक्यातील हमीदपूर येथे किराणा दुकान आहे. महिलेच्या जाळ्यात अडकलेला क्लासवन अधिकारी हा हमीदपूर येथीलच आहे. हे चौघे अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. २६ एप्रिल रोजी या महिलेने व्यावसायिकाला घरी बोलविल्यानंतर त्याचे अमोल मोरे याने व्हिडिओ चित्रीकरण केले. एक मे रोजी अधिकाऱ्याला अडकविण्यात महेश बागले, सागर खरमाळे व सचिन खेसे यांचा सहभाग होता.  

व्हिडीओ मिळताच लूटमारमहिलेच्या बंगल्यात आलेल्या पुरुषाला सदर महिला शरीर संबंध करण्यास भाग पाडायची. यावेळी घरातील जिन्यात व बाथरूममध्ये लपून असलेले तिचे साथीदार अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करायचे. व्हिडिओ पूर्ण होताच त्या व्यक्तीवर हे तरुण हल्ला करून त्याच्याकडील पैसे व दागिने हिसकावून घ्यायचे.

चर्चा अनेकांची मात्र तक्रार नाहीमहिलेच्या जाळ्यात अडकलेल्या अनेकांच्या नावाची चर्चा आहे. मात्र बदनामीच्या भीतीपोटी हे लोक पोलिसांकडे तक्रार देण्यास घाबरत आहेत. नगर शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तीही याच हनीट्रॅपची शिकार ठरल्याची चर्चा आहे. तक्रारदार समोर आल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे. या टोळीने ज्यांना खंडणी मागितली आहे त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन या गुन्ह्याचे तपासी अधिकारी राजेंद्र सानप यांनी केले आहे.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपPoliceपोलिस