नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाच्या जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून लष्करी तळांची गोपनिय माहिती चोरल्याचे प्रकरण गेल्या वर्षी उघड झाले होते. यामुळे खळबळ उडाली होती. आता पाकिस्तानने नौदलाच्या डझनावर अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. या प्रकरणी नौदलाच्या 11 जवानांना अटक करण्यात आली आहे.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये नौदलाचे 11 जण आणि अन्य दोघेजण आहेत. या साऱ्यांच्या सोशल मिडीयावरील अकाऊंटवर नजर ठेवण्यात आली होती. हे सर्वजण काही संशयित प्रोफाईलच्या संपर्कामध्ये असल्याचे समजले होते. आंध्रप्रदेश पोलिस आणि केंद्र सरकारची तपास यंत्रणा यांनी मिळून या हनी ट्रॅपमध्ये फसलेल्या जवानांचा तपास केला.
नौदलाचे हे जवान एकाच राज्यातील नसून ते मुंबई, कर्नाटक, विशाखापट्टनम या ठिकाणांवरील आहेत. हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर या जवानांनी पाकिस्तान पुरस्कृत महिलांना भारतीय नौदलाची गोपनिय माहिती पुरविली आहे.
सैन्य दलाचे अधिकारी हनी ट्रॅपच्या विळख्यात? लष्कराकडून सावधगिरीच्या सूचना
अश्लील फोटो आणि केवळ पाच हजार रुपयांसाठी त्याने केली देशाशी गद्दारी
सोशल मिडीयाच्या चुकीच्या वापरामुळे भारतीय नौदलामध्ये ड्युटीवर असताना स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे नौदलाचे अधिकारी, कर्मचारी केवळ टू जी फोनच वापरू शकतात. भारतीय सैन्य दल आणि हवाईदलामध्येही अशाप्रकारची बंदी घालण्यात आली आहे. एवढे करूनही हनी ट्रॅपची प्रकरणे समोर आली आहेत.