कोल्हापूर : शहरातील आणखी एका व्यापाऱ्यास हनीट्रॅपच्या माध्यमातून अडीच लाखाला लुटल्याची तक्रार शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी हनीट्रॅप टोळीचा म्होरक्या सागर पांडुरंग माने याच्यासह विजय यशवंत मोरे, सिया मोरे, तिचा भाऊ म्हणून सांगणारा अनोळखी तरुण, फारुख बाबासाहेब शेख , विजय ऊर्फ पिंटू शंकर कुलकुटगी या सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहेया प्रकरणातील महिलेने एका बड्या व्यापाऱ्याशी संपर्क वाढवला. संबंधित महिला व तो व्यापारी दुचाकीवरून फिरत असताना सागर मानेसह इतर पाच जणांनी त्या दोघांना रस्त्यात अडवले. दमदाटी, शिवीगाळ करून मारहाण केली. पोलिसांत बलात्काराची केस नोंदवण्याची धमकी देऊन अडीच लाख रुपये उकळले.
सहावा ‘हनीट्रॅप’ आठवडाभरात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार ‘हनीट्रॅप’ करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जुना राजवाडा, शाहुपुरी, शिरोली एमआयडीसी, कागल, गोकुळ शिरगाव व आता लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण सहा तक्रारी दाखल झाल्या. यापैकी तीन ‘हनीट्रॅप’ हे माने टोळीकडून घडले आहेत.