शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

आधी सिनेमा दाखवला, मग दागिने घेतले त्यानंतर बापानेच पोटच्या पोरीला पाण्यात ढकललं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 12:12 PM

३१ ऑक्टोबरच्या सिनेमा दाखवण्याच्या बहाण्याने बापाने मुलीला थिअटरला नेले. सिनेमा पाहिल्यानंतर तिला जिथे हवे तिथे शॉपिंग करायला सांगितले.

बेल्लारी - कर्नाटकच्या बेल्लारी इथं हॉरर किलिंगचं प्रकरण उघडकीस आले आहे. निर्दयी बापानं स्वत:च्या मुलीला कालव्यात ढकलून मारून टाकलं. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. हत्येची गुन्हेगारानं कबुली दिली असून मुलगी दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम करत होती. त्यामुळे नाराज वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचलत मुलीलाच संपवण्याचा विडा उचलला. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ओमकार गौडाच्या मुलीचं दुसऱ्या जातीतील मुलासोबत अफेअर सुरू होतं. ही बाब बापाला कळाल्यानंतर त्याने मुलीला वॉर्निंग दिली. मुलासोबतचे नाते संपवण्यासाठी बापाने मुलीवर दबाव टाकला. परंतु मुलीने प्रेमापोटी काही ऐकले नाही. मुलासोबतचं नाते तोडण्यास मुलीने विरोध केला. मुलीच्या या विरोधामुळे बाप संतापला. त्याने मुलीला आयुष्यातून उठवण्याचा निर्णय घेत प्लॅन रचला. 

३१ ऑक्टोबरच्या सिनेमा दाखवण्याच्या बहाण्याने बापाने मुलीला थिअटरला नेले. सिनेमा पाहिल्यानंतर तिला जिथे हवे तिथे शॉपिंग करायला सांगितले. त्यानंतर दोघेही ज्वेलरी शॉपमध्ये गेले. त्याठिकाणी दागिने खरेदी केले. त्यानंतर बाप लेकीला घेऊन घराच्या दिशेने चालला होता. तेव्हा रस्त्यात त्याने कालव्याजवळ गाडी थांबवली. मुलीला कारमधून बाहेर येण्यास सांगितले. बापाच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा जराही अंदाज पोरीला नव्हता. ज्याने आपल्याला जन्म दिला तोच बाप आपल्या जीवावर उठल्याचं पोरीच्या मनातही नव्हतं. 

काही विचार न करता पोरगी कारमधून खाली उतरली आणि बापाजवळ गेली. पण त्याचाच फायदा घेत बापाने पोरीला कालव्यात ढकलून दिले. मुलगी मदतीसाठी आरडाओरडा करू लागली परंतु निर्दयी बापानं तिला पाण्यात ढकलून तिथून निघून गेला. कालव्यातील पाण्यात बुडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी बाप घरी न जाता थेट तिरुपतीला पळाला. खूप वेळ झाले वडील मुलगी घरी परतले नाहीत त्यामुळे घरच्यांनी दोघांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाप परतला तेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांना बापाच्या बोलण्यावर संशय वाटला. तेव्हा खाकी वर्दीचा धाक दाखवताच आरोपी बापानं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने मुलीला मारल्याचं पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. त्याचसोबत मुलीचा मृतदेह कालव्याजवळ शोधण्यात आला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"