सैराट! पळून लग्न केलं म्हणून मेहुण्याने भावोजीचं शिर कापलं; बहिणही फासावर लटकलेली दिसली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 17:03 IST2021-03-11T16:43:20+5:302021-03-11T17:03:25+5:30
Honour Killing in Jabalpur : पूजाने (१९) १३ डिसेंबर २०२० ला घरातून पळून जाऊन ब्रजेश कश्यप नावाच्या तरूणासोबत लग्न केलं होतं. तेव्हापासूनच पूजाचा भाऊ सूड घेण्यासाठी संधी शोधत होता.

सैराट! पळून लग्न केलं म्हणून मेहुण्याने भावोजीचं शिर कापलं; बहिणही फासावर लटकलेली दिसली...
मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून(Jabalpur) ऑनर किलिंगची(Honour Killing) धक्कादायक घटना समोर आली आहे. खोटी शान जपण्यासाठी एका प्रेमकथेचा दु:खद अंत करण्यात आला. आरोप आहे की, तरूणाने त्याच्या भावोजीची कुऱ्हाडीने गळा कापून हत्या केली. तर दुसरीकडे बहिणीचा मृतदेह घरात फासावर लटकलेला दिसला. ही घटना गुरूवारी सकाळी ९.३० वाजताची आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
zeenews.india.com ने दिलेल्या वृत्तानुसार, पूजाने (१९) १३ डिसेंबर २०२० ला घरातून पळून जाऊन ब्रजेश कश्यप नावाच्या तरूणासोबत लग्न केलं होतं. तेव्हापासूनच पूजाचा भाऊ सूड घेण्यासाठी संधी शोधत होता. तिलवाराच्या शंकरघाटमध्ये राहणारा मिंटू शिवराम शुक्ला ऊर्फ धीरज(३५) पोलीस स्टेशनमध्ये एक पिशवी घेऊन पोहोचला. ज्यात त्याचा भावोजी ब्रजेश कश्यपचं डोकं होतं. जे पाहून पोलीस हैराण झाले. (हे पण वाचा : खळबळजनक! प्रियकराने लग्नास दिला नकार, तरूणीने त्याला फसवण्यासाठी केली स्वत:च्या बहिणीची हत्या....)
दोघांनी पळून जाऊन केलं होतं लग्न
धीरजला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने ब्रजेश कश्यप(३२) ची रमनगराच्या बर्मन गल्लीत हत्या केल्याचं कबूल केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले तर त्यांना शेतात ब्रजेशचं धड आढळून आलं. ब्रजेशने १३ डिसेंबर २०२० ला धीरजची बहीण पूजाला घरून पळून नेऊन लग्न केलं होतं. पूजाच्या घरातील लोकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी दोघांनाही २७ फेब्रुवारीला शोधून काढलं होतं. (हे पण वाचा : छोट्या भावाने आधी लग्न केले, मोठ्या भावाकडून पती-पत्नीची हत्या)
पूजाचा मृतदेह घरात फासावर
पूजाने घरी जाण्यास नकार दिला होता. ब्रजेश आणि पूजा जबलपूरच्या गढामध्ये भाड्याच्या घरात राहत होते. गुरूवारी तो आपल्या गावी आला होता. यादरम्यान धीरज शुक्लाने त्याची गळा कापून हत्या केली. हत्येच्या काही वेळातच पोलिसांना सूचना मिळाली की गढामध्ये पूजाचा मृतदेह फासावर लटकलेला आहे. आता पूजाने आत्महत्या केली की, तिचीही हत्या झाली याचा पोलीस शोध घेत आहेत.