कल्याण - शहराच्या पश्चिमेतील निक्कीनगर येथे असलेल्या चस्का कॅफेवर कल्याण गुन्हे अन्वशेषण शाखेच्या पोलिसांनी काल रात्री छापा टाकला. कॅफेच्या आडमध्ये हुक्का पार्लर चालविला जात असल्याचे या छाप्या दरम्यान उघड झाले आहे. पोलिसांनी ७० जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.
कोरोना काळात रात्री अकरानंतर संचारबंदी लागू करण्यात आालेली आहे. ही संचारबंदी सकाळी सहा वाजेर्पयत आहे. कल्याण पश्चिमेतील गांधारी येथील निक्कीनगर येथील उच्चभ्र लोकवस्ती चस्का कॅफे चालविला जात होता. कॅफेच्या आज हुक्का पार्लर चालविला जात होता. पोलिसांनी काल रात्री दहा वाजताच्या सुमारास चस्का कॅफेवर छापा टाकला. त्यावेळी त्याठिकाणी अनेक जण हुक्का पीत असल्याचे दिसून आले. ही कारवाई पहाटे दोन वाजेर्पयत सुरु होती. पोलिसानी छापा टाकून कोणीही आत अथवा बाहेर जाऊ नये यासाठी कॅफे सील केला होता. कॅफेत जवळपास 1क्क् पेक्षा जास्त लोक होते. त्यात नव तरुण तरुणींचा समावेश जास्त होता. काही फॅमिलीही त्यात कॅफेचा आनंद घेत असल्याचे मिळून आले. पोलिसांनी जवळपास ७० जणांना त्याच ठिकाणी नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई केली जाणार आहे. कॅफे चालक मालक आणि वेटर यांच्या विरोधातही ही कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी कॅफेतील सगळे हुक्का साहित्य जप्त केले आहे.