अमेरिकेमध्ये शाळेत, चर्च, हॉटेलमध्ये गोळाबाराच्या घटना काही नवीन नाहीत. शस्त्रांची तस्करीच एवढी होतेय की अशा घटना वाढतच चालल्या आहेत. परंतू सहा वर्षांच्या निरागस मुलाने क्लासरुममध्ये आपल्या टीचरला गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे सारेच टेन्शनमध्ये आले आहेत.
शिक्षिकेला गोळी झाडल्यानंतर या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हर्जिनियाच्या पोलीस प्रमुखांनी सांगितले की, सध्या महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तिची प्रकृती नाजूक आहे. हा कोणताही अपघात नव्हता तर शिक्षिकेसोबत काही वाद झाल्याने मुलाने तिच्यावर गोळी झाडली आहे.
या घटनेमध्ये अन्य कोणतीही मुले सहभागी नव्हती. गोळीबारानंतर शाळेत दहशतीचे वातावरण आहे. मुलाला बंदूक कुठून मिळाली याची माहिती त्याने दिलेली नाही. रिचनेक एलिमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही, असे पोलिसांनी सांगितले. तर जखमी झालेली शिक्षिका ही ३० वर्षांची होती.
एका मुलाचा पालक असलेल्या जोसेलिन ग्लोव्हर यांनी सांगितले की, मला शाळेत गोळीबार झाल्याचे एकाला अटक झाल्याचा मेसेज आला होता.