नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,97,00,313 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,208 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,330 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,81,903 लोकांना गमवावा आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने कोरोनाग्रस्त रुग्णाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चौकशीतून धक्कादायक कारण समोर आलं आहे.
तामिळनाडूमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. एका सरकारी रुग्णालयात कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने एका कोरोना रुग्णाची गळा दाबून हत्या केली आहे. आपल्या पैशाची आणि मोबाईलची गरज असल्याने हत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती तिने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्याला 23 मे रोजी कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आठ जूनला त्याचा मृतदेह आढळला.
कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. अधिक तपास केला असता रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच पैशासाठी हत्या केल्याचं कबूल केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुजरातमधील सुरतमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. मास्क लावला नाही म्हणून पोलीस हवालदाराने आपल्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मास्क न घालता फिरत असल्याच्या कारणावरुन या हवालदाराने पीडित महिलेला ताब्यात घेतलं होतं. सुरत येथील उमरपाडा पोलीस स्थानकामध्ये हा हवालदार कार्यरत आहे.
धक्कादायक! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसाने केला बलात्कार; परिसरात खळबळ
मास्क घातलं नाही म्हणून कठोर कारवाई करेन अशी धमकी देत हवालदार मला त्याच्यासोबत घेऊन गेल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यानंतर या हवालदाराने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर पुढे अनेक महिने तो माझ्यावर वारंवार बलात्कार करायचा असं देखील म्हटलं आहे. महिलेने हवालदारावर बलात्काराचा आरोप केलेला असतानाच हवालदाराच्या पत्नीने पीडित महिला जातीवरुन आरोप करत असल्याचा दावा केला आहे. नरेश कपाडिया असं असं आरोप करण्यात आलेल्या पोलिसांचं नाव आहे. त्यामुळेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.