शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

मित्राच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारून बांधले घर, पोलिसांनी असा केला प्रकरणाचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:47 PM

Crime News: लॉकडाऊनच्या काळात गावातील मित्राने सोबत राहून त्याच्याच बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला मारला. या पैशांतून त्याने गावी घर बांधल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या पूर्व विभाग सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात गावातील मित्राने सोबत राहून त्याच्याच बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला मारला. या पैशांतून त्याने गावी घर बांधल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या पूर्व विभाग सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. प्रदिपकुमार साहू असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळून तीन मोबाईल फोन, बँक खात्यांची पासबुक, ६ एटीएम कार्ड आणि १ लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त केला आहे. (The house was built on a friend's bank account, one arrest from Uttar Pradesh)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील साहुने तक्रारदार यांच्या बँक खात्यातून २ लाख ६० हजार ७५३ रुपयांवर ऑनलाईन डल्ला मारला होता. त्याने ही रक्कम उत्तर प्रदेशमधील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा बँकेतील खात्यांवर वळती केली होती. त्याआधारे तपास करत सायबर पोलिसांनी आरोपींचा माग काढत उत्तर प्रदेश गाठले.

ज्या खात्यांवर ही रक्कम जमा झाली होती, ते खातेधारक बँकांचे सेवा केंद्र चालवत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अधिक चौकशीमध्ये एका महिलेने तिच्या भावाच्या शस्त्रक्रियेसाठी पतीने रक्कम पाठवल्याची बतावणी करुन ही रक्कम काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

अशात पैसे काढणारी महिला गावातील मित्र साहू याची पत्नी असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली. साहू यानेच  लॉकडाऊनच्या काळात सोबत राहताना तक्रारदार यांना त्यांच्या मोबाईलमध्ये गुगल पे खाते उघडून देऊन त्याआधारे त्यांच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी सापळा रचून साहू याला प्रयागराजमधून ताब्यात घेत अटक केली आहे. तपासात गावी घर बांधण्यासाठी त्याने हा प्रताप केल्याचे समोर आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMumbaiमुंबई