शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

चित्तथरारक! घरात पडला होता रक्ताचा सडा; एकाच कुटुंबांतील चौघांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 2:24 PM

Murder Case : आरोपींना दाखवायचा होता गृहकलह: तिघांना स्पेंडलने मारले तर एकाला लावला गळफास

ठळक मुद्देबहिण पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व भाऊ तेजस रेवचंद बिसेन (१७) हे दुसऱ्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला.रेवचंद डोंगरु बिसेन यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन ह्या आजघडीला ९० वर्षाच्या आहेत.

तिरोडा (गोंदिया) : तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. सकाळी १० वाजता ड्रायव्हर वाहन घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला घरात चार मृतदेह दिसून आले. एकाच कुटुंबातील चौघांचा खून हा व्यवसायातून झाला की संपत्तीतून झाला हे सांगता येत नाही. आतापर्यंत या खुनाचा उलगडा झाला नाही. एकाच कुटुंबातील चौघांचा खून करणाऱ्या आरोपींमध्ये अनेक आरोपींचा समावेश असावा असा कयास लावला जात आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रेवचंद डोंगरु बिसेन (५१), मालता रेवचंद्र बिसेन (४५), पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०), तेजस रेवचंद बिसेन (१७) अशी एकाच कुटुंबातील मृत चौघांची नावे आहेत. रेवचंद डोंगरु बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोर व एक ट्रॅक्टर आहे. ते ट्रान्सपोर्टचे काम करतात. रेशनचे धान्य ट्रान्सपोर्ट करण्याचे काम ते करीत होते. २१ सप्टेंबरच्या पहाटे बिसेन कुटुंबियांच्या घरी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखर झोपेत असलेल्या लोकांवर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने डोक्यावर वार करून झोपेत असलेल्या लोकांवर वार करून ठार करण्यात आला. मालता रेवचंद बिसेन ह्या एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या हाेत्या. बहिण पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व भाऊ तेजस रेवचंद बिसेन (१७) हे दुसऱ्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला.

गळफास लावलेला दोर दारातून खिडकीला बांधून ठेवला होता. आरोपींनी नियोजनबध्द पध्दतीने हा खून नाही आत्महत्या वाटावा यासाठी रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता. या घटनेची माहिती मिळताच तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव व पोलीस अधिक्षक विश्व पानसरे घटनास्थळावर दाखल झाले. मारण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टरचा स्पेंडल हा घटनास्थळपासून घराच्या वऱ्हाड्यांतच १५ फूट अंतरावर फेकलेला आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिरोडाच्या उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.

९० वर्षाची म्हातारीच राहीली जिवंतरेवचंद डोंगरु बिसेन यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन ह्या आजघडीला ९० वर्षाच्या आहेत. त्या समोरच्या खोलीत आपल्या खाटेवर झोपल्या होत्या. आरोपी मागच्या दारातून आले आणि त्यांनी या चौघांना संपविले तरी खेमनबाई यांना या घटनेचा सुगावा नसावा. या म्हाताऱ्या खेमनबाई यांना या घटनेचे काय माहिती आहे यावरूनही पोलिस धागेदोरे  जोडतील.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसFamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारी