डाेंबिवली-मुंबई, कल्याण, डाेंबिवली, ठाणे शहरात रात्री घरफाेडी करायेच आणि नशेसाठी मेडिकल स्टाेअरमधून काेरेक्सच्या औषधाची चाैरी करणाऱ्या दाेन सराईत चाेरट्यांना मानपाडा पाेलिसांनी काल अटक केली आहे. सरुद्दीन शेख आणि माेहम्मद शहा अशी या चाेरट्यांची नावे आहेत. त्यांच्याविराेधात विविध पाेलिस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडून दागिने आणि राेकड मिळून २१ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी हस्तगत केला आहे.
मानपाडा पाेलिस ठाण्याचे गस्ती पथक गस्तीवर असताना मानपाडा सर्कल ते उसरघर रस्त्यावर उसरघर येथे दिवा मुंब्रा दिशेने एक दुचाकी येताना दिसली. पाेलिसांना पाहून दुचाकीवरुन येणारे दाेघे जण दुचाकी जाकीच टाकून पळ काढला. गस्तीवर असलेल्या पाेलिसांना त्यांचा संशय आला. पाेलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्या दाेघांना पाेलिसांनी अटक केली. दाेघांच्या विराेधात कल्याण, डाेंबिवली, ठाणे, मुंबई येथील पाेलिस ठाण्यात घरफाेडीचे २६ गुन्हे दाखल आहेत.
चाैकशी दरम्यान पाेलिसांनी या दाेन्ही चाेरट्यांकडून टिळकनगर, विष्णूनगर आणि नाैपाडा पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील १२ चाैरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. त्यांच्याकडून ३२ ताेळे साेने, ६२ ताेळे चांदी आणि राेकड असा एकूण २१ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक सराईत चाेरटे हे रात्रीच्या सुमारास दुकाने शटर उचकटून नशेकरीता काेरेक्स आैषध चाेरी करायचे. तर बंद घऱे हेरुन त्या घरात घऱफाेडी करायेच. मानपाडा पाेलिस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा घडला हाेता. त्या गुन्हयातील आराेपीच्या शाेधात पाेलिस हाेते. गस्तीवर असताना पाेलिसांच्या हाती हे दाेघेही लागले अशी माहिती पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.