शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

घरकाम करणाऱ्या मोलकरणींनी केली चोरी, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जणांना अटक

By पंकज पाटील | Published: August 29, 2022 8:37 PM

अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.    

अंबरनाथ : काम करत असलेल्या दोन ठिकाणी मोलकरणींनी चोरी केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे,  त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.    

शिवाजीनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एका मोलकरणीने तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून २९ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एटीएम  कार्ड असा दोन लाखांचा मुद्देमाल पळवून नेला होता. या प्रकरणी २५ जुलै रोजी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाअंती कर्जत तालुक्यातील शेलू येथील सीमा बुधाडे आणि साईनाथ केळुसकर या दोघांना अटक केली होती. त्यांनी चोरलेले दागिने ठेवल्याचे समजल्यानंतर, संबंधित फायनान्स कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय एटीएम कार्डाच्या आधारे आरोपींची विकत घेतलेल्या वस्तू देखील हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.  

दुसऱ्या प्रकरणात देखील घरातील मोलकरणीने दोन लाखांचे दागिने चोरल्याचा गुन्हा २१ ऑगस्ट २०२२ रोजी दाखल झाला होता. या प्रकरणी अंबरनाथ येथे राहणाऱ्या सावित्री माणिकपुरी आणि तिची साथीदार दर्शना कदम यांनी गुन्हा केल्याचे समोर आले होते. चोरी प्रकरणी दोघींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला . गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत गुन्हा उघडकीला आणण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिसGoldसोनं