Sameer Wankhede nikah nama: एनसीबीचे मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक, त्यानंतर एनसीबीचाच साक्षीदार यांनी गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांचे पहिले लग्न, ते त्यांच्या वडिलांचे नाव आणि जात बदलून नोकरी मिळविल्याचे आरोप यामुळे आर्यन खान ड्रग प्रकरण बाजुलाच पडले आहे. समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद (Dawood Wankhede)) असल्याचा दावा नवाब मलिक यांनी करत निकाहनाम्याची प्रतच त्यांनी जाहीर केली आहे. यामुळे मोठा वादंग झाला आहे.
समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) दुसरी पत्नी क्रांती रेडकर बाजू मांडत आहे. परंतू आता समीर वानखेडे यांचे पहिले लग्न लावून देणारा मौलानाच समोर आला असून तेव्हा ते मुस्लिमच होते असा दावा केला आहे. यावर ज्या नावावरून वाद वाढला आहे ते दाऊद म्हणजेच ज्ञानदेव वानखेडे (dnyandev Wankhede) समोर आले आहेत.
समीर वानखेडेंचा निकाह झाला होता हे ज्ञानदेव यांनी देखील कबूल केले आहे. आज तकला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी त्यांचे नाव दाऊद कसे आले ते सांगितले आहे. निकाहनामा खरा आहे, मात्र आम्ही हिंदू आहोत. मी, माझा मुलगा आणि मुलगी असे छोटे कुटुंब आहे. आम्ही सारे हिंदू आहोत. माझी पत्नी मुस्लिम होती, असे ते म्हणाले.
होय, मी करून दिला होता समीर-शबानाचा निकाह! काझींनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला
समीर वानखेडे यांच्या वडिलांना जेव्हा दाऊद नावाविषयी विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ते एक मोठे लग्न होते. मला उर्दू येत नाही. माझ्या पत्नीने माझे नाव तिथे दाऊद लिहिले असावे. परंतू माझे खरे नाव ज्ञानदेव आहे, दाऊद नाही. मी काहीही लपविलेले नाही. मी जन्मापासून हिंदू आहे.
मौलाना काय म्हणाले...२००६ मध्ये समीर आणि शबाना यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी समीर यांनी आपण मुस्लिम असल्याचं सांगितलं होतं, अशी माहिती मौलाना मुझम्मील अहमद यांनी दिली. मंत्री नवाब मलिक यांनी शेअर केलेला निकाहनामा खरा असल्याचंदेखील मौलानांनी म्हटलं आहे. त्यावेळी समीर, शबाना (समीर यांची पहिली पत्नी), त्याचे वडील सगळे मुस्लिम होते. समीर हिंदू असते, तर निकाहचा झाला नसता. कारण शरियतनुसार असा निकाह होत नाही. शरियतविरोधात जाऊन काझी निकाह लावत नाही. आज समीर काहीही सांगत असले, तरीही त्यावेळी ते मुस्लिमच होते,' असा दावा मौलाना मुझम्मील अहमद यांनी केला.
समीर वानखेडेंच्या काकांनी वेगळीच स्टोरी सांगितली...समीर वानखेडेंचे मोठे काका म्हणजेच ज्ञानदेव कचरू वानखेडेंचे मोठे बंधू यांनीही ज्ञानदेव वानखेडे हेच समीरच्या वडिलांचं नाव असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच, आमचं मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुड तुफा हे असून पैनगंगेच्या तिरावर गाव वसल्याचंही त्यांनी सांगितलं. लहानपणापासून लग्नकार्यात, घरगुती कार्यक्रमात समीर गावाकडं यायचा. नवाब मलिक यांनी जी हरकत घेतली ती चुकीची आहे. कारण, ज्ञानदेव हे कुटुंबीयांसमेवत नोकरीनिमित्त जेथे राहायला गेले, तेथे मुस्लीम एरिया असल्याने लोकांमध्ये त्यांचं येणं-जाणं होतं, उठणं-बसणं असायचं. त्यावेळी, तेथील लोकांनी तुम्हाला दाऊद म्हटलं तर चालेल का असं म्हटलं होतं. तेव्हा दाऊद म्हणात, इब्राहीम म्हणा, काहीही म्हणा... मला काही देणंघेणं नाही, असे ज्ञानदेव यांनी म्हटल होतं, अशी आठवण त्यांच्या मोठ्या भावाने सांगितली आहे, ते निवृत्त शिक्षक आहेत.