ठळक मुद्देकाबुलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात नमाज पढताना कमीतकमी चार लोक ठार आणि 20 जण जखमी झाले, अशी अफगाण पोलिसांनी माहिती दिली.
काबूल - उत्तर काबुलमधील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटातमशिदीचे इमामही मरण पावले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तान पोलिसांनी दिली आहे. ईदच्या दिवशी मशिदीत बॉम्बस्फोटाची घटना उघडकीस आली आहे. या भयानक स्फोटात नमाज अदा करण्यासाठी आलेल्या अनेकांचा मृत्यू झाला आहे, तसेच इतरही अनेकजण जखमी झाले आहेत.काबुलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात नमाज पढताना कमीतकमी चार लोक ठार आणि 20 जण जखमी झाले, अशी अफगाण पोलिसांनी माहिती दिली. जखमींमध्ये मशिदीचे इमाम होते, असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. पुढे अधिकाऱ्याने सांगितले की, बॉम्ब मशिदीच्या आत ठेवला गेला होता. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.भारतासह अनेक देशांमध्ये आज रमजान ईदचा सण साजरा केला जात आहे. पाक रमजान महिन्याच्या उपवासानंतर ईद साजरी केली जाते. ईदचा सण प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात असला तरी तो साजरा करण्याचा आनंद आणि उत्साह सर्वांमध्ये सारखाच आहे. काबूल पोलिसांचे प्रवक्ते फिरदावास फरमारझ म्हणाले की, स्फोटके मशिदीच्या आत ठेवण्यात आले होते. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे काबुल पोलिसांनी म्हटले आहे. हा स्फोट अशा वेळी घडला आहे, जेव्हा ईद उल फितरच्या पार्श्वभूमीवर तालिबान आणि अफगाण सरकारने तीन दिवस युद्धविराम जाहीर केला होता.