माणुसकी हरवली! चौथी सुद्धा लेक जन्माला आली; नवऱ्याने पत्नीची गळा आवळून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:15 PM2021-05-15T21:15:30+5:302021-05-15T21:16:23+5:30

Woman killed for giving birth to 4th girl : ही घटना गुरुवारी शिवपुरी जिल्हा मुख्यालयापासून ८० किमी अंतरावर असलेल्या धमधौली गावात घडली.

Humanity lost! The fourth was also born girl; Husband strangles wife to death | माणुसकी हरवली! चौथी सुद्धा लेक जन्माला आली; नवऱ्याने पत्नीची गळा आवळून केली हत्या 

माणुसकी हरवली! चौथी सुद्धा लेक जन्माला आली; नवऱ्याने पत्नीची गळा आवळून केली हत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देसावित्रीचे लग्न जवळपास सहा वर्षांपूर्वी रतनशी झाले होते आणि तेव्हापासून रतन आणि त्याचे आई वडील सावित्रीवर हुंड्यासाठी अत्याचार करीत असत आणि मुलगी झाल्याबद्दल तिला शिव्याशाप देत असत.

मध्य प्रदेशात मुलीच्या जन्मानंतर महिलेचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात चौथ्या मुलीचा जन्म झाला म्हणून एका २८ वर्षीय महिलेचा नवरा आणि सासरच्यांनी मिळून गळा आवळून हत्या केली. ही घटना गुरुवारी शिवपुरी जिल्हा मुख्यालयापासून ८० किमी अंतरावर असलेल्या धमधौली गावात घडली.

सीहोरचे पोलिस निरीक्षक रामराजा तिवारी यांनी शुक्रवारी दाखल गुन्ह्याच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, सावित्री बघेल यांचे पती रतन सिंह, सासरे के. सिंग आणि सासू बेनू बाई यांनी गुरुवारी गळा आवळून खून केला. ते म्हणाले की, मृत महिलेच्या भाऊ कृष्णाच्या मते, त्याची बहीण सावित्रीचे लग्न जवळपास सहा वर्षांपूर्वी रतनशी झाले होते आणि तेव्हापासून रतन आणि त्याचे आई वडील सावित्रीवर हुंड्यासाठी अत्याचार करीत असत आणि मुलगी झाल्याबद्दल तिला शिव्याशाप देत असत.

तिवारी पुढे म्हणाले की, मृताच्या भावाने असे सांगितले आहे की, सावित्रीने तीन महिन्यांपूर्वी चौथ्या मुलीला जन्म दिला होता आणि त्यामुळे आरोपींनी गुरुवारी तिचा गळा दाबून खून केला. ते म्हणाले की, तिन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम ३०२ (खून) आणि ३०४ ब (हुंडाबळी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: Humanity lost! The fourth was also born girl; Husband strangles wife to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.