ठाणे जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह बॅंकेत २ कोटी रूपयांचा फेक गोल्ड लोनचा घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा पती-पत्नीने बॅंक मॅनेजर आणि गोल्ड व्हॅल्यूअरच्या मदतीने केला. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलीस आरोपींना अटक करण्याच्या प्रयत्नात होते. नुकतीच पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी पती-पत्नी आपल्या गावी येत आहेत. या सूचनेनंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी पती-पत्नीला अटक केली.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिसांनी आरोपी हेमंत उदावंत आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. असे सांगितले जाते की, उदावंत आणि त्याची पत्नी २०१६ पासून फरार होते. दोघांनी २०१६ मध्ये ठाणे जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह बॅंकेतून दोन कोटी रूपयांचं फेक गोल्ड लोन घेतलं. आरोपीने बॅंकेत आपली पत्नी आणि परिवारातील इतर सदस्य, ड्रायव्हर, कर्मचाऱ्यांचे आणि नातेवाईकांच्या नावाने बॅंक खाते उघडले. यानंतर बॅंक मॅनेजर बॅंकेच्या गोल्ड व्हॅल्यूअर आणि इतर स्टाफच्या मदतीने हा घोटाळा केला. (हे पण वाचा : सव्वा लाखाची लाच मगितल्याप्रकरणी नाशिकमध्ये तलाठ्याविरुद्ध गुन्हा)
या खात्यांच्या माध्यमातून नकली सोनं गहाण ठेवून त्यावर साधारण दोन कोटी रूपयांचं लोन घेतलं गेलं. साधारण ५.६ किलो नकली सोन्याचे दागिने बॅंकेत गहाण ठेवताना बॅंकेच्या गोल्ड व्हॅल्यूअरने ते खरं सोनं असल्याचं नोंदवलं. अशाप्रकारे बॅंक मॅनेजरकडू उदावंत आणि त्याच्या नातेवाईकांना अनेकदा लोन मंजूर करण्यात आलं. (हे पण वाचा : ठाण्यातील वैद्य कुटूबियांच्या प्रामाणिकपणामुळे चार लाखांचे सोन्याचे दागिने सुखरुप मिळाले)
२०१६ मध्ये व्हिस्ल ब्लोअरमुळे हा घोटाळा समोर आला होता. तेव्हा पोलिसांनी बॅंक मॅनेजर, बॅकेचा सिक्यरिटी स्टाफ आणि गोल्ड व्हॅल्यूअरसहीत इतरही काही लोकांना अटक केली होती. पण उदावंत आणि त्याची पत्नी पोलिसांना सापडले नव्हते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. या आठवड्याच्या सुरूवातीला मोखाडा पोलिसांना सूचना मिळाली की, उदावंत मोखाडामध्ये आपल्या गावी येणार आहे. पोलिसांनी त्यानुसार, सापळा रचला. बुधवारी जसा उदावंत आणि त्याची पत्नी गावात पोहोचले त्यांना पोलिसांनी अटक केली.