शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

सौदीतून पतीने केला कॉल, बिहारमध्ये पत्नीने उचलले टोकाचे पाऊलं; कुटुंब झालं उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 1:07 PM

मुझफ्फरपूरच्या मोतीपूरमध्ये पतीसोबत फोनवरून झालेल्या भांडणानंतर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सौदीत कामासाठी गेलेल्या पतीचा रात्री उशीरा पत्नीला कॉल येतो. फोनवरील बोलणं झाल्यानंतर पत्नी रुम बंद करुन घेते. घरचे सकाळी उठतात तर तीन महिन्याच्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. घरचे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात पण आतून काहीच हालचाल होत नाही. यानंतर कुटंबिय दरवाजा तोडतात तर आत महिलेचा मृतदेह दिसतो. ही घटना बिहारमधील आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

5 मुलांचा बाप शेजारच्या 3 मुलींच्या आईच्या प्रेमात पडला; पळून गेला, नातेवाईकांचा गंभीर आरोप

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २१ वर्षीय झीनत आफरीनने मुझफ्फरपूरमधील मोतीपूर येथील बरूराज पोलीस स्टेशन हद्दीतील फुलवारिया गावात गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी उशिरापर्यंत खोली न उघडल्याने तीन महिन्यांच्या मुलीच्या ओरडन्याचा आवाज ऐकून दरवाजा तोडला, यावेळी  महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृताच्या सासूने सांगितले की, रात्री फोनवर पतीसोबत वाद झाल्यानंतर ती दार लावून झोपली होती. सकाळी आत्महत्येची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी एसकेएमसीएचमध्ये पाठवला. पोलिसांनी कुटुंबीयांचे तोंडी जबाब घेतले. मृताच्या सासू जमिला खातून यांनी सांगितले की, घरात सासू, सून आणि तीन महिन्यांची मुलगी राहतात. चार महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा मोहं. रुस्तम सौदीत कामासाठी गेला आहे.

गुरुवारी झीनत आफरीन आणि रुस्तुम यांच्यात मोबाईल फोनवर काही कारणावरून भांडण झाले. ती खूप रागावलेली दिसत होती. रात्री ती दुसऱ्या खोलीत झोपायला गेली. आफरीनने मुलासह स्वतःला खोलीत कोंडून घेतले. सकाळी उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्याने संशय आल्याने आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली. दरवाजा ठोठावल्यानंतर आफरीनचा आवाज आला नाही आणि मुलगी आतून रडत होती. त्यानंतर गावकऱ्यांनी दरवाजा तोडला. आत आफरीन तिच्या साडीला लटकत होती. गावकऱ्यांनी फास कापून मृतदेह बाहेर काढून बेडवर ठेवला. यानंतर घटनेची माहिती बरुराज पोलीस ठाण्यात देण्यात आली.

माहिती मिळताच एसआय सुमन झा यांनी एका टीमसह घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी एसकेएमसीएचमध्ये पाठवला. पोलिस ठाण्याचे अध्यक्ष संजीवकुमार दुबे यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण आहे. तसे, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. शवविच्छेदनानंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस