शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

बापरे! जल्लाद पतीने पत्नीचे हात कुऱ्हाडीने कापले; द्यावी लागणार 3 कोटीची नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 4:13 PM

Crime News : पतीने महिलेवर कुऱ्हाडीने 40 वार केले होते. मोठ्या कष्टाने तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

मॉस्को : कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेला रशियासरकार भरपाई देणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानेरशियाला पीडित महिलेला 3,70,000 युरो किंवा सुमारे 30 दशलक्ष रुपये म्हणजेच ३ कोटी रुपये देण्यास सांगितले आहे. वास्तविक, महिलेच्या जल्लाद पतीने कुऱ्हाडीने वार करून तिचे दोन्ही हात कापले होते. नंतर ऑपरेशनने एक हात जोडण्यात आला, परंतु दुसरा हात जोडण्यात डॉक्टरांना यश आले नाही. पतीने महिलेवर कुऱ्हाडीने 40 वार केले होते. मोठ्या कष्टाने तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.यामुळे पतीने हल्ला केल्याचे सांगितले'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, युरोपियन मानवाधिकार न्यायालयाने रशियाला २७ वर्षीय मार्गारिटा ग्रॅच्योवासह चार घरगुती हिंसाचार पीडितांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागली. डिसेंबर 2017 मध्ये, मार्गारीटाचा पती दिमित्री ग्रेचेव्ह याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. जल्लाद पतीने मार्गारीटा 40 वर कुऱ्हाडीने वार केले आणि तिचे दोन्ही हात कापले. खरं तर, पतीला संशय आला की आपल्या पत्नीचे दुसर्‍या व्यक्तीशी प्रेमसंबंध आहे, त्यामुळे त्याने इतक्या टोकाचा निर्णय घेतला. 

पबच्या बाथरुममध्ये कपल झालं इंटिमेट, केलं खूप नुकसान; आकारला मोठा दंड 

किळसवाणा प्रकार! १०० महिलांच्या मृतदेहांवर रुग्णालयातील इलेस्ट्रीशियनने केले बलात्कार

पोलिसांनी तक्रारीकडे लक्ष दिले नाहीदिमित्री ग्रॅच्योव्हला नंतर न्यायालयाने दोषी ठरवले आणि 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पीडितेने यापूर्वी पोलिसांना सांगितले होते की, तिचा पती तिला मारहाण करायचा, परंतु अधिकाऱ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. हे प्रकरण गांभीर्याने घेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियन सरकारला मार्गारिटा ग्रॅच्योव्हाला वैद्यकीय खर्च आणि मानसिक-शारीरिक आघातासाठी भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच न्यायालयाने अन्य चार महिलांनाही नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे.रशियाने यापूर्वीच नकार दिला आहेन्यायालयाने रशियाला अशी प्रकरणे रोखण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले आहे. याआधीही अशाच एका प्रकरणात रशियाने पीडितेला नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. घरगुती हिंसाचारासाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असे रशियन सरकारने म्हटले होते. त्याचवेळी, हिंसाचार पीडित महिलांची केस लढणाऱ्या वकील मारी दावतयान (Mari Davtyan)यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सरकारच्या निष्क्रियतेमुळे प्रत्येक महिला गंभीर जखमी झाल्याचे लिहिले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrussiaरशियाGovernmentसरकारPoliceपोलिसCourtन्यायालय