शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

विवाहितेस जाळून मारणाऱ्या पती, सासऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 20:05 IST

Sentenced to life imprisonment in murder Case : पुसद तालुक्यातील घटना : जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा निकाल

ठळक मुद्देया प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षदारांची साक्ष घेण्यात आली.

पुसद (यवतमाळ) : विवाहितेला मारहाण करून व जाळून जीवे मारल्या प्रकरणात आरोपी पती व सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.गावंडे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. अमोल देशमुख व विजय देशमुख अशी यातील आरोपींची नावे असून छाया अमोल देशमुख असे मृत महिलेचे नाव आहे.

तालुक्यातील गौळ (बु) येथे १५ सप्टेंबर २०१२ मध्ये ही घटना घडली होती. मृतक छाया हिचे लग्न आरोपी अमोल देशमुखसोबत २००९ मध्ये झाले होते. मात्र चारित्र्यावर संशय घेऊन पती अमोल देशमुख, सासरा विजय व सासू अन्नपूर्णाबाई छायाचा छळ करीत होते. घटनेच्या दिवशी छायाने तिच्या आईस फोन करून याबाबत माहिती दिली. परंतु त्याच रात्री ११ वाजता छाया जळाल्याची माहिती फोनवरून छायाच्या काकास देण्यात आली. या प्रकरणात छायाचे काका तानाजी चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोफाळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा नोंद केला. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचे आढळून आले. तसेच शरीरावर मारहाणीच्या, गळा दाबल्याच्या खुणा मिळून आल्यात. जिवंतपणीच तिला केरोसीन टाकून जाळल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक डी. सी. राठोड यांनी साक्षदारांचे बयान नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षदारांची साक्ष घेण्यात आली. परिस्थितीजन्य पुरावा व वैद्यकीय अधिकारी शरद कुचेवार यांची साक्ष, सरकारी वकील महेश निर्मल यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी पती अमोल देशमुख आणि सासरा विजय देशमुख यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सासू अन्नपूर्णाबाई हिला निर्दोष मुक्त केले. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकाॅन्स्टेबल दिलीप राठोड व पोलीस काॅन्स्टेबल राहुल मार्कंडे यांनी काम पाहिले.आरोपींचा ‘तो’ मुद्दा अपयशीया प्रकरणात आरोपीने बचावासाठी वेगळाच मुद्दा पुढे केला होता. गावातील एका इसमाविरुद्ध मृतक हिने पूर्वी जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. त्या इसमानेच खून केला असल्याची शक्यता व्यक्त करीत आरोपीने बचावात्मक पवित्रा घेतला होता. परंतु त्याबाबतीत आरोपी ठोस पुरावा सादर करू शकले नाही.

टॅग्स :Courtन्यायालयYavatmalयवतमाळPoliceपोलिसLife Imprisonmentजन्मठेप