शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

पतीने घेतला गळफास लावून अन् पत्नीने केले विष प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 7:16 PM

शिवणी-येणस गावांत खळबळ : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना 

ठळक मुद्देशिवणी रसुलापूर येथील रहिवासी मयूर मरगडेचे येणस गावातील पूनमशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला.शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मयूरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांनी मयूरचा मृतदेह नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. 

अमरावती - पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच माहेरी असलेल्या पत्नीनेही विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात घडली. मयूर रमेश मरगडे (२५) व पूनम मयूर मरगडे (२२, दोन्ही रा. शिवणी रसुलापूर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवणी रसुलापूर येथील रहिवासी मयूर मरगडेचे येणस गावातील पूनमशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला. दोघेही शिवणीत राहत होते. बुधवारी मरगडे दाम्पत्य रक्षाबंधन कार्यक्रमासाठी येणस गावी गेले होते. गुरुवारी मयूर शिवणी रसूलापूर गावी निघून गेला, तर पूनम ही माहेरीच थांबली. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मयूरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या माहितीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी मयूरचा मृतदेह नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. दरम्यान, मयूरने आत्महत्या केल्याची माहिती पूनमला फोनवरून कळविण्यात आली. पतीच्या निधनाची वार्ता कळताच पूनमला धक्का बसला. तिनेही दुपारी २.३० च्या सुमारास विष प्राशन केले. यादरम्यान शेतात असलेले पूनमचे वडील रामराव उंबलकार यांना जावयाच्या आत्महत्येबद्दल माहिती प्राप्त झाली. त्यांनी शिवणीला जाण्यासाठी घर गाठले असता, पूनमने विष प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी पूनमला मृत घोषित केले. घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच पंचक्रोशीतील अनेकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. यामुळे मोठी गर्दी झाली होती. 

मयूरला दारूचे व्यसनमयूर शेतमजुरी करून कुटुंंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता. त्याला मद्याचे व्यसन व जुगार खेळण्याचा नाद होता. त्यामुळे अनेकदा सासरे रामराव उंबलकार समजावून सांगायचे. जुगारात पैसे हरल्याच्या मानसिक तणावातून शुक्रवारी त्याने मद्याच्या अंमलातच आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू होती. 

 

पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर पत्नीनेही विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपविले. या घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. - नरेश पारवे, पोलीस निरीक्षक, नांदगाव खंडेश्वर

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी