- मनीषा म्हात्रेमुंबई - पती समलिंगी असून, लग्नानंतर तासन्तास मित्राशी गप्पा मारत असल्याचा आरोप करत, विवाहितेने पोलिसांत धाव घेतली आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी आयटी कंपनीत काम करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार २८ वर्षीय रश्मी (नावात बदल) ही सी.बी.ई. इन प्रॉडेक्शनमध्ये पदवीधर आहे. तिची आई एका नामांकित इंग्रजी विद्यालयात शिक्षिका आहे. वाशी येथील आयटी कंपनीत नोकरी करणाºया रमेशने (नावात बदल) तिला विवाहासाठी मागणी घातली़ लग्नाची बोलणी सुरू झाली. सुरुवातीला रमेशच्या घरच्यांनी लग्न थाटामाटात करण्याची मागणी केली. त्या वेळी रश्मीने लग्नाला नकार दिला. मग रमेशच्या आई-वडिलांनी मागणी मागे घेतली. त्यानंतर साखरपुडा पार पडला. त्यापाठोपाठ ऐरोलीत साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला. लग्नानंतर एक महिना रश्मी रमेशसोबत मुलुंड येथील भाड्याच्या घरात राहण्यास गेली. त्यानंतर, तो पुण्यात आयटी कंपनीत नोकरी लागल्याचे सांगून एकटाच निघून गेला. जानेवारीमध्ये २०१८ मध्ये रश्मीही सासू-सासऱ्यांसोबत तेथे राहण्यास गेली.सुरुवातीला लग्न थाटामाटात न केल्यावरून वाद करून रमेश शारीरिक संबंध टाळू लागला. नंतर जाड असल्याचे सांगून तिला जबरदस्तीने बारीक होण्यासाठी फिटनेस सेंटरला पाठविले. वेगवेगळी कारणे पुढे करत, तो तिच्यापासून लांब राहत होता. माहेरच्यांनी सणाला भेटवस्तू पाठविल्या नाहीत, म्हणून त्रास सुरू केला.रमेश लग्न झाल्यापासून महिन्यातून एकदाच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. त्या वेळी तो समलिंगी असल्याचे लक्षात आल्याचा आरोप तिने केला आहे. त्यातही तो रोज रात्री तासन्तास एका मित्राशी गप्पा मारत असे. याबाबत जाब विचारताच सासरच्यांनी तिलाच मानसिक रोगी असल्याचे ठरविले. त्यामुळे तिने सासू-सासºयांसोबत बोलणे बंद केले. यातून एप्रिलमध्ये तिला मारहाण करत घराबाहेर काढले. माहेरच्यांनी समजूत काढत तिला सासरी सोडले. त्यानंतर, पुन्हा नोव्हेंबरमध्ये सासरच्यांनी माहेरी सोडून दिले. पतीने किंवा सासू-सासºयांनी साधी विचारपूससुद्धा केली नाही. तेव्हापासून ती माहेरीच राहते.आत्महत्येचा प्रयत्नरमेशने छोट्या-छोट्या कारणांवरून वाद घालण्यास सुरुवात केली. घरखर्चासाठी पैसे देणे बंद केले. त्याच्या मनाप्रमाणे जेवण बनविता येत नसल्याच्या कारणावरून टोमणे मारून बोलायचा. सप्टेंबरमध्ये सासू-सासरे अमेरिकेत गेले. तेथे रमेशच्या बहिणीशी बोलत नसल्याच्या रागात भांडण केले. यातूनच तिने हारपिक पीत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे ती वाचली. तेव्हादेखील एका कोºया कागदावर नमूदचे कृत्य हे मी माझ्या मर्जीने केले असून, त्यासाठी कोणीही जबाबदार नसल्याचे लिहून घेतले होते.अखेर पोलिसांत धाववारंवार विनंती करूनदेखील पतीने लक्ष न देता, मित्रालाच प्राधान्य दिल्याने रश्मीने गुरुवारी पवई पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यात तिने वरील घटनाक्रमाला वाचा फोडली आहे. त्यानुसार, पवई पोलिसांनी पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.
पती मित्रासोबत तासन्तास गप्पा मारतो म्हणून गुन्हा दाखल, पती समलिंगी असल्याचा पत्नीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 2:59 AM