बंगळुरु - जिल्ह्यास्तरीय सरकारी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या ३० वर्षीय पुरुषाला पोलिसांनी पत्नीला इंजेक्शन देऊन हत्या केल्यापरकरणी अटक केली आहे. सोमवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. इजूर पोलिसांनी याप्रकरणी व्यकंटेश नावाच्या पतीस बेड्या ठोकल्या आहेत. दीपा (२४) आणि व्यकंटेश (३०) यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झालं होते. लग्नानंतर पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे तिच्या लक्षात आलं. त्यावर तिने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती काही ऐकत नव्हता. अखेर तिने त्याला जाब विचारला आणि त्याचा राग मनात ठेवून त्याने तिला संपविण्याचा निर्णय घेतला.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेश हा एका सरकारी रुग्णालयात डाटा एण्ट्रीचं काम करतो. त्याला काही औषधांची माहिती होती. एक दिवस तो विषारी औषधाचं इंजेक्शन घेऊन घरी आला आणि दीपा गाढ झोपेत असताना त्याने दीपाला ते विषारी इंजेक्शन दिलं आणि हत्या केली. व्यंकटेशने दीपाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रात्री १ वाजताच्या सुमारास रुग्णालयात पोचताच दीपाला उपचाराआधीच मृत घोषित केले. दीपाच्या कुटुंबीयांनी व्यंकटेशविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
अफेअरबद्दल जाब विचारल्याने नवऱ्याने पत्नीचा इंजेक्शन देऊन काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:19 PM
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
ठळक मुद्देदीपा (२४) आणि व्यकंटेश (३०) यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झालं होते.इजूर पोलिसांनी याप्रकरणी व्यकंटेश नावाच्या पतीस बेड्या ठोकल्या आहेत. व्यंकटेश हा एका सरकारी रुग्णालयात डाटा एण्ट्रीचं काम करतो.