उत्तर प्रदेशमधील बांदामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहित महिलेने आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. महिलेने तिचा पती नपुंसक असल्याचा आरोप केला असून लग्नाआधी ही गोष्ट लपवून ठेवली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. महिलेने सासरच्या मंडळींवर हुंडा मागितल्याचा आरोपही केला. तक्रारीत सासरच्यांनी हुंड्यासाठी मारहाण केल्याचे म्हटले आहे.
सातारा: कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथे १३ वर्षीय मुलाचा खून; उसाच्या फडात आढळला मृतदेह
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलेच्या पतीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले. हे प्रकरण तिंदवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. महिलेने दिलेली माहिती अशी, ६ महिन्यांपूर्वी तिचे हमीरपूर येथे लग्न झाले होते. गेल्या ३ महिन्यांपासून ती तिच्या माहेरच्या घरी राहत होती. पती नपुंसक असल्याचही तक्रारीत म्हटले आहे, तिने पतीला याचे कारण विचारले असता त्याने उत्तरे दिली नाही.
तिच्या सासरच्यांनी ही गोष्ट तिच्या आणि तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवली. एवढेच नाही तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ सुरू केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यामुळे ती आई-वडिलांच्या घरी आली आणि तिथे राहू लागली. महिलेचे म्हणणे आहे की, तिचे सासरचे लोक तिला धमक्या देतात. तिंदवारी पोलीस ठाण्याचे प्रमुख कौशल सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या पतीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. यासोबतच हुंड्याच्या मुद्द्यावरही पोलीस कारवाई करत आहेत.