बिहारच्या(Bihar) नालंदा जिल्ह्यातील थरथरी परिसरात एका पतीने कथितपणे त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या(Murder) केली आहे. रिपोर्टनुसार, अचानक माहिती न देता घरी पोहोचल्यावर त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत रंगेहाथ (Extra Marrital Affair) पकडलं होतं. समोर सुरू असलेला सगळा प्रकार पाहून पती संतापला आणि त्याने कुदळीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या (Crime) केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचं नाव सबलू कुमार आहे. तर त्याच्या पत्नीचं नाव रेखा देवी (३२) आणि प्रियकराचं नाव हिलसा धर्मपूरचा राहणारा निशांत कुमार असं आहे.
पोलिसांनी माहिती दिली की, रूपनबिगहा गावातील रहिवाशी सबलू कुमार दुसऱ्या राज्यात नोकरी करतो. तो बुधवारी घरी आला तेव्हा त्याला पत्नी रेखा एका दुसऱ्या पुरूषासोबत विचित्र अवस्थेत दिसली. हे बघून तो संतापला आणि त्याने कुदळीने दोघांची हत्या केली. नंतर तो फरार झाला. स्थानिक लोकांनी सांगितले की, रेखाचं माहेर हिलसाच्या धर्मपूरमध्ये आहे. (हे पण वाचा : प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत)
त्यांनी सांगितले की, निशांतही तेथीलच आहे. रेखाचा पती घरी नसतो त्यामुळे तो नेहमीच रेखाला भेटायला येत-जात होता.गावातील लोकांनी सांगितले की, पतीच्या कारनाम्याची माहिती सबलू कुमारला लागली होती. त्यामुळे तो न सांगताच अचानक घरी पोहोचला आणि त्याने पत्नीला निशांतसोबत विचित्र अवस्थेत पाहिले. त्यामुळे तो आणखीन संतापला. (हे पण वाचा : पत्नीने प्रियकर आणि भावोजीच्या मदतीने केली पतीची हत्या, १५ महिन्यांनी झाला केसचा खुलासा....)
पोलीस उपअधिक्षक संजय कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक पाहणीत ही प्रेम प्रसंग हत्येचं प्रकरण आहे. तपासानंतर नेमकं प्रकरण समोर येईल. सध्या दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस प्रकरणाचा तपास घेत आहेत. तर आरोपी सबलू कुमार अजूनही फरार आहे.