मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यातून हत्येचा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पतीने त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. त्यानंतर पतीने त्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने हत्या केली. मृत व्यक्ती आरोपीचा शेजारी आहे. जखमी स्थितीत व्यक्ती आपल्या घराजवळ पोहोचला तिथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचेल आणि त्यांना मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
आरोपी मजुरीच्या कामानिमित्ताने नेहमीच घरातून बाहेर राहत होता. त्याचं नाव दादूलाल बैगा असून असून तो मजुरीला बाहेर गेल्यावर त्याची पत्नी घरी एकटीच राहत होती. 20 एप्रिलला रात्री साधारण 12 वाजता तो आपल्या घरी आला. तेव्हा त्या पत्नी शेजारील पुरूषासोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसली. जे बघून तो संतापला.
आरोपीने घरातील धारदार हत्याराने तरूणावर हल्ला केला. यात तरूण गंभीर जखमी झाला. पण तो कसातरी तिथून पळाला. थोड्या अंतरावर असलेल्या आपल्या घरासमोर तो पोहोचला आणि तिथेच पडला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई धावत आली. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. पोलीस याचाही शोध घेत आहेत की, आरोपीच्या पत्नीने मृत व्यक्तीसोबत कसे आणि कधीपासून संबंध होते.