शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

कॉन्स्टेबल पत्नीच्या चारित्र्यावर संशय, ५ जीव गेले; पोलीस वसाहतीत सगळेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 6:23 PM

बायकोचं परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरून पतीने उचललं घातक पाऊल, २ मुलांसह पत्नी, सासूची हत्या करत पतीने केली आत्महत्या

भागलपूर - शहरातील पोलीस वसाहतीत एका युवकाने त्याच्या पोलीस कॉन्स्टेबल पत्नीची हत्या केली. त्यासोबतच २ मुले आणि सासूचा गळा दाबला आणि स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. प्रेमविवाहानंतर एकमेकांसोबत सात जन्म राहण्याची शपथ घेणाऱ्या या जोडप्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सगळेच हैराण आहेत. 

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील नीतू आणि आरा जिल्ह्यातील पंकजची मैत्री एका मॉलमध्ये नोकरी करताना झाली होती. पुढे जाऊन या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यात नीतूने बिहार पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तयारी केली. २०१५ ला तिला यश मिळालं. कॉन्स्टेबल बनल्यानंतर २०१९ मध्ये नीतूने जानेवारीत पंकजसोबत लग्न केले. लग्नानंतर दोघांना २ मुले झाली. सुरुवातीला नीतूची पोस्टिंग नवगछिया इथं होती. त्यानंतर भागलपूर एसएसपी कार्यालयात बदली झाली. 

सरकारी नोकरीमुळे कॉन्स्टेंबल नीतू कुटुंबासह पोलीस वसाहतीत राहायला आली. जिथं पंकज, २ मुले, नीतू आणि त्याची सासू हसतखेळत राहत होते. नीतूचा नवरा पंकज एका बुटाच्या दुकानात काम करत होता. त्यातच पंकज आणि नीतू यांच्या संसाराला संशयाचं ग्रहण लागलं. अनैतिक संबंधांवरून पंकज आणि नीतू यांच्यात भांडण होऊ लागली. नीतूचे अन्य पुरुषाशी संबंध आहेत असं पंकजला वाटत होते. त्यामुळे त्यांच्या सुखी संसारात वाद सुरू झाले.

मंगळवारी पहाटे एका दूधवाल्याने रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पाहिले आणि त्याने तातडीने शेजाऱ्यांना कळवलं. पोलिसांनी टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी काही मृतदेह बेडवर तर काही जमिनीवर पडल्याचे पाहिले. पंकजचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. सोमवारी रात्री नीतू आणि पंकजमध्ये घराबाहेर काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून पंकजनं आत्महत्येपूर्वी पत्नी, २ मुले आणि सासूचा खून केल्याचं कबुल केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी