सोशल मीडियाची अनेकांना सवय लागली आहे. अनेकजण इन्स्टाग्रामवर दोन-दोन तास रिल्स पाहण्यात व्यस्त असतात. इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे एका महिलेला जीवावर बेतले आहे. सतत इन्स्टाग्राम पाहण्याच्या कारणावरुन महिलेला तिच्याच पतीने ठार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
ही घटना तमिळनाडू येथील तिरुपूर जिल्ह्यातील आहे. येथील ३८ वर्षीय अमृतलिंगन हे मार्केटमध्ये मजुरी करतात. अमृतलिंगन याची पत्नी एका कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काम करत होती. हे दाम्पत्य सेलमनगर परिसरात राहत होते.
मिळालेली माहिती अशी, पत्नी सोशल मीडियावर जास्तवेळ सक्रीय होती. तिने इन्स्टाग्रामवर खातेही सुरू केले होते. यावर रोज जास्तवेळ रिल्स पाहण्यात व्यस्त असायची. यामुळे तिचे घरातील कामावरही लक्ष नसायचे. त्यामुळे पती पत्नीत रोज भांडण व्हायचे.
Pune crime : खडकीत दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई
ती महिला स्वत:चे रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर शेअर करु लागली. तिची प्रसिद्धीही जास्त वाढत होती. महिलेने अभिनय करण्याचे ठरवले, यासाठी ती एकदा चेन्नईलाही जाऊन आली होती. तिच्या या निर्णयाला पतीने विरोध केला. यावरुन दोघात वाद सुरू झाला. या वादात पतीने रागात महिलेचा गळा आवळला, यात तिचा मृत्यू झाला. पतीच्या लक्षात येताच त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.