शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पत्नीचे अनैतिक संबंध पतीच्या जीवावर बेतले, मृतदेह फेकून दिला खाडीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 9:38 PM

तिघांना अटक : मृतदेहावरील कपडय़ांवरुन पोलिसांनी लावला छडा

ठळक मुद्देयाप्रकरणी तपासादरम्यान मृतदेहावरील कपडय़ांवरुन त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीमध्ये १३ फेब्रुवारीला एक अज्ञात मृतदेह आढळला होता.

नवी मुंबई - अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीची हत्या करणाऱ्याला दोन साथीदारांसह पोलिसांनीअटक केली आहे. गतमहिन्यातली घणसोलीतली हि घटना असून सदर मृतदेह एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीत सापडला होता. याप्रकरणी तपासादरम्यान मृतदेहावरील कपडय़ांवरुन त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीमध्ये १३ फेब्रुवारीला एक अज्ञात मृतदेह आढळला होता. सदर मृत व्यक्तीच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने घाव केल्याच्या जखमा होत्या. त्यानुसार मृतदेहाची ओळख पटवण्याच्या प्रयत्न पोलिसांनी नवी मुंबईसह राज्यभरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती मिळवली. परंतु सदर मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. अखेर मयत व्यक्तीच्या वयाचा अंदाज घेवून त्या वयाच्या बेपत्ता असलेल्या व्यक्तींकडे चौकशीवर जोर देण्यात आला होता. त्याकरिता गुन्हे शाखा कक्ष तीन चे वरिष्ठ निरिक्षक विजय कादबाने, पनवेल शहरचे वरिष्ठ निरिक्षक अजयकुमार लांडगे, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक संदीपान शिंदे, मध्यवर्ती कक्षाच्या सहायक निरिक्षक राणी काळे, सहायक निरिक्षक श्रीकांत शेंडगे, पोलीस हवालदार शरद भरगुडे, शेखर वक्टे, प्रविण बाबा, गौतम कांबळे आदींचे पथक तयार करण्यात आले होते.

त्यांनी घणसोली येथून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या चौकशीत मृतदेहाची ओळख पटली. यावेळी त्यांचे नाव खडकबहादुर सिंग (४५) असल्याचे समोर आले. परंतु त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा होवू शकलेला नव्हता. यामुळे पोलिसांनी तांत्रीक तपासावर भर दिला असता, तिघांची माहिती समोर आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हत्येचा गुन्हे उघडकीस आला. यानुसार कैलाश खरात (29), जय  चव्हाण (२५) व वली सय्यद (२०) यांना अटक केली. तिघेही रबाळे परिसरातील राहणारे आहेत. त्यापैकी कैलास याचे सिंगच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे प्रेयसीच्या पतीचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याने जय व वली यांच्या मदतीने सिंग यांची ९ फेब्रुवारीला घणसोलीत एकांताच्या ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. त्यानंतर मध्यरात्री दिडच्या सुमारास मृतदेह रिक्षातून ऐरोली पुलावरुन खाडीत फेकला होता. त्यानंतर तो चार दिवसांनी एनआरआयच्या खाडीत आढळल्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरवात केली होती.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई