कर्नाल-
हरियाणाच्या कर्नालमध्ये पोलिसांनी एका डबल मर्डर प्रकरणाचा उलगडा केला आहे. या प्रकरणातील आरोपी विश्वजीत याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं ज्या कुऱ्हाडीनं मित्राची हत्या केली तीही पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपीनं याआधी अतिशय निर्घृण पद्धतीनं पत्नीची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीत याच्या वडिलांनी याआधी विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे. विश्वजीत याची एक शाळा होती जिथं त्याचा जवळचा मित्र केअर टेकर म्हणून काम करत होता. विश्वजीतनं आपल्या पत्नी आणि मित्रावर विवाहबाह्य संबंधाचा संशय होता. याच संशयातून त्यानं दोघांची हत्या केली आहे.
पत्नीची हत्या केल्यानंतर मित्रालाही संपवलंदोन महिन्यांआधी आरोपीनं अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर शनिवारी जवळचा मित्र नवीन याचीही आरोपीनं कुऱ्हाडीनं हल्ला करुन हत्या केली. इतकंच नव्हे, तर आरोपीनं नवीन याची हत्या केल्यानंतर त्याचं गुप्तांग देखील ९० टक्के कापलं.
मित्राची हत्या केल्यानंतर आरोपी विश्वजीत यानं मृतदेह एका खोलीत टाकला आणि खोलीला टाळं ठोकलं. तर बाजूच्याच खोलीत तो आपल्या मुलांसोबत राहात होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधीच पोलिसांनी याप्रकरणात विश्वजीतच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. विश्वजीतनं ३ जून रोजी स्वत:च्या पत्नीची हत्या केली होती. तर ५ जूनला पत्नीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील केले. आरोपीशी कुटुंबीय आणि पत्नीच्या सासरचीही मंडळी संपर्क ठेवत नव्हती. त्यामुळे याची कुणालाच कानोकान माहिती कळली नाही.
बॅटनं हल्ला करुन केली हत्यापत्नीचे आपल्या मित्रासोबत अनैतिक संबंध आहेत असा संशय आरोपी विश्वजीत याला होता. याच संशयातून त्यानं पत्नीची बॅटनं मारुन हत्या केली. तर मित्राला दारु पाजून त्याच्यावर कुऱ्हाडीनं वार करुन त्याचीही हत्या केली.