एका महिलेनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा प्रकार छत्तीसगढच्या दुर्ग येथे उघडकीस आला आहे. हत्या केल्यानंतर महिलेच्या प्रियकरानं स्वत:ला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगत रुग्णालय गाठलं आणि अॅडमिट झाला. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या मदतीनं पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. पोलिसांनी या प्रकरणात दोघांनाही अटक केली आहे.
छत्तीसगढच्या दुर्ग जिल्ह्यात जुन्या भिलाई ठाणे हद्दीत हाऊसिंग बोर्ड चरोदा येथील रहिवासी सुनील शर्मा यांचं रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पोलिसांना त्यांच्या राहत्या घरात सापडला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील यानं रात्री जेवण केल्यानंतर तो त्याच्या खोलीत झोपायला गेला होता. तर शेजारच्या खोलीत त्याची पत्नी राणी शर्मा आपल्या दोन मुलींसह झोपल्या होत्या. राणी यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावण्यात आली होती. कुटुंबीयांना जेव्हा सकाळी सुनील याच्या खोलीत प्रवेश केला तर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहायला मिळाला.
पोलिसांनी याप्रकरणा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली. यात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली तसंच शेजारच्यांचीही चौकशी केली गेली. त्यानंतर मोबाइल लोकेशनची माहिती घेत कॉल डिटेल्स तपासण्यात आले तर एका क्रमांकावर वारंवार कॉल्स व व्हॉट्सअॅप मेसेज केले गेल्याचं दिसून आलं.
कॉल्स आणि व्हॉट्सअॅप मेसेजेसनं झाला खुलासाकॉल आणि व्हॉट्सअॅप डिटेल्सची तपासणी करण्यात आल्यानंतर संबंधित क्रमांक धीरज कश्यप नावाच्या व्यक्तीचा असल्याचं लक्षात आलं. मृत्यू झालेल्या सुनील शर्मा याची पत्नी राणी शर्मा या धीरजसोबत सातत्यानं संपर्कात असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. नीरज कश्यप आणि राणी शर्मा दोघं रिलेशनशीपमध्ये होते याची माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पत्नी राणी शर्मा आणि तिचा प्रियकर धीरज कश्यप याला अटक केली आहे.
दोघांनी मिळून सुनील शर्मा याच्या हत्येचा कट रचल्याचं देखील कबुल केलं आहे. आरोपी धीरज यानं सुनील शर्मा याची हत्या केल्यानंतर स्वत:ला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगून चंदूलाल चंद्राकर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला होता. पण प्रत्यक्षात तो निगेटिव्ह होता. पोलिसांनी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर धीरज याला अटक केली आहे.