तुर्कीमध्ये(Turkey) एका पतीने आपल्या गर्भवती पत्नीसोबत जे केलं ते वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. सुंदर बटरफ्लाय व्हॅलीमध्ये (Butterfly Valley) त्याने अनेक तास घालवले. आणि त्यानंतर १ हजार फूट उंचीवरून तिला धक्का(Wife Murder) दिला. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीला तसंच मरण्यासाठी सोडून दिलं. याचं कारण समोर आलं आहे.
Mirror च्या रिपोर्टनुसार ही घटना जून २०१८ तील आहे. या प्रकरणावर अजूनही पोलीस तपास करत आहे. दक्षिण-पूर्व तुर्कीचं शहर मुगला येथे राहणारा ४० वर्षीय हाकान आयसाल पत्नी सेमरा आयसालसोबत बटरफ्लाय व्हॅलीला फिरायला गेला होता. यावेळी त्यांनी डोंगरावर फोटोही काढले. आरोपी आहे की, सेल्फी घेतल्यानंतर हाकानने पत्नी सेमराला १ हजार फूट उंचीवरून धक्का दिला आणि ती खाली पडली. सेमराचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. हाकानला यानंतर अटक करण्यात आली. पतीने केलेल्या या कृत्यामागील कारण समोर येत आहे. (हे पण वाचा : विवाहित प्रेयसीने मजा केल्यानंतर लग्नास दिला नकार, लिव इनमध्ये राहणाऱ्या तरूणाने केली आत्महत्या...)
म्हणून केली हत्या
हाकानने काही दिवसांपूर्वी पत्नीच्या नावाने एक विमा काढला होता. विम्याचा हाकान हा एकमेव नॉमिनी आहे. विम्याच्या नियमांनुसार जर सेमराचा एखाद्या दुर्घटनेत आकस्मिक मृत्यू झाला तर नॉमिनीला ४० हजार लीराचा क्लेम मिळेल. (हे पण वाचा : खळबळजनक! ब्रेकअपनंतर तरूणीने बॉयफ्रेन्डला घरी बोलवलं, मग होणाऱ्या पतीच्या मदतीने केली त्याची हत्या..)
सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. वकिलांनी दावा केला की, हाकान तीन तास टेकडीवर यासाठी बसून राहिला की, आजूबाजूला कुणी नाही ना हे बघू शकेल. जशी त्याला संधी मिळाली त्याने सेमराला १ हजार फूट उंचीवरून खाली ढकललं. यानंतर या निर्दयी पतीने ४० हजार लीरा म्हणजे साधारण ४० लाख रूपयांचा क्लेम केला. पण तपासादरम्यान तो रद्द करण्यात आला.
कुटुंबियांनी केला मोठा खुलासा
तुर्कीच्या स्थानिक कोर्टाने हाकानला तुरूंगात टाकण्याचा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे मृत महिलेच्या कुटुंबियांनी खुलासा केला आहे की, समेराच्या पतीने तिच्या नावाने तीन लोनही घेतले होते. कदाचित ते हडपण्यासाठीच त्याने तिची हत्या केली. कुटुंबियांनी सांगितले की, सेमराला उंचीची भीती वाटत होती. तरी मुद्दामहून तो तिला १ हजार फूट उंच डोंगरावर घेऊन गेला.