अलिगड - उत्तर प्रदेशच्या अलिगड जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका 25 वर्षीय महिलेने तिच्या पतीने तिला आणि आपल्या मुलांना नवीन कपडे विकत न घेतल्यामुळे सहा महिन्यांच्या मुलीला मरेपर्यंत मारहाण केली. ही घटना रविवारी रामपूर गावात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीसाठी नवीन कपडे विकत घेण्यासाठी बाजारात येण्यास नकार दिल्याने आरोपी पिंकी शर्मा आणि तिचा नवरा राहुल यांच्यात वाद झाला.पिंकीने तिचा संताप आपल्या लहान मुलगी सोनीवर काढला आणि तिला इतक्या वाईट प्रकारे मारहाण केली की त्या बालिकेचा मृत्यू झाला.राहुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंकीविरोधात भादंवि कलम ३०२ (खून) अन्वये गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली. पोलीस स्टेशन प्रभारी नरेशकुमार सिंग यांनी सांगितले की, आरोपी पिंकीने पोलिसांना सांगितले की तिने आपलया मुलीला जाणूनबुजून मारले नाही. ते पुढे म्हणाले की, घरगुती वादातून तिच्या पतीबरोबरच्या सतत भांडणामुळे ती निराश झाली होती आणि तिने केलेल्या कृत्यातून तिच्या मुलीचे काही बरेवाईट होईल याची जाणीव तिला नव्हती. पिंकीचे चार वर्षापूर्वी फॅक्टरीतील कामगार असलेल्या राहुलशी लग्न झाले आणि त्यांनाही तीन वर्षाचा मुलगा आहे.
होळीला नवे कपडे घेण्यास पतीचा नकार, आईने चक्क मुलीलाच केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 9:53 PM
ही घटना रविवारी रामपूर गावात घडली.
ठळक मुद्देया घटनेत एका 25 वर्षीय महिलेने तिच्या पतीने तिला आणि आपल्या मुलांना नवीन कपडे विकत न घेतल्यामुळे सहा महिन्यांच्या मुलीला मरेपर्यंत मारहाण केली. राहुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंकीविरोधात भादंवि कलम ३०२ (खून) अन्वये गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली.