पतीने केला पत्नीचा सौदा अन् जयपूरमध्ये विकले; प्रेमविवाहाला झाले होते अवघे ९ महिने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:07 PM2022-02-03T18:07:40+5:302022-02-03T18:10:58+5:30
Husband sells wife's deal in Jaipur : जयपूरमध्ये 2 महिने कैदेत राहिल्यानंतर, कशीतरी मुलगी शिवपुरीला पळून गेली. यानंतर पीडित मुलीने आरोपी पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.
मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये प्रेम, लग्न आणि नंतर फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. भावाने आधी वहिनीच्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिच्याशी लग्न केले. पैसे कमावण्यासाठी पतीने स्वतःच्या पत्नीला सेक्स रॅकेटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केल्याने सर्व मर्यादा ओलांडली. पीडित मुलीला हे मान्य नसताना पतीने जयपूर येथील एका तरुणासोबत तिचा सौदा केला. जयपूरमध्ये 2 महिने कैदेत राहिल्यानंतर, कशीतरी मुलगी शिवपुरीला पळून गेली. यानंतर पीडित मुलीने आरोपी पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.
वास्तविक, श्योपूरच्या डोंगरपूर गावात राहणारा सतीश जाटव याच्या भावाचं सासर शिवपुरी जिल्ह्यातील झरी गावात आहे. सतीश हा त्याच्या भावाच्या सासरच्या घरी वारंवार जात असे. त्यानंतर तो त्याच्या वाहिनीच्या बहिणीला भेटला. दोघांमधील जवळीक वाढू लागली. सतीशने मुलीला प्रोपोज केले. मुलगीही तिच्या बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली आणि मुलगी हो म्हणाली. यानंतर दोघेही एकत्र राहू लागले.
9 महिने एकत्र होते
मुलगी आणि तिचा आरोपी पती जवळपास 9 महिने एकत्र राहत होते. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांचेही मंदिरात लग्न लावून दिले. लग्नानंतर काही दिवस दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले, मात्र काही काळानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. सतीशने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने पत्नीवर सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पत्नी सहमत न झाल्याने सतीशने तिला दोन महिन्यांपूर्वी राजस्थानमधील जयपूर येथे राहणाऱ्या सोनरामला विकले.
नववधूच्या हातच्या स्पेशल चहाने सासरच्या मंडळींची उडवली झोप, रात्री दोन मुलं आली घरी...
महिलेला विवस्त्र करून पार्कात काठ्यांनी केली मारहाण, लैंगिक अत्याचारानंतर केला खून
पत्नीचा सौदा झाला, पीडितेला 2 महिने कैद
सौदा झाल्यानंतर सोनरामने मुलीला जयपूरमध्ये ओलीस ठेवले. दोन महिने त्याने तिच्यावर अत्याचार केला. अखेर एक दिवस संधी मिळताच मुलगी जयपूरमधून पळून गेली. मंगळवारी मुलगी शिवपुरी येथे आली. त्यानंतर पीडितेने तिची संपूर्ण कहाणी गावातील कुटुंबीयांना सांगितली. यानंतर दुपारी तरुणीने शिवपुरी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. यामध्ये मुलीने पती सतीश, सासरा रतिराम, मामे सासरे नरेश आणि जयपूरचे रहिवासी सोनराम यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.