शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात गेम पलटला! भाजप ४५, काँग्रेस ४२; जम्मूमध्ये स्थिती जैसे थे
2
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
3
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
4
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
5
अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
6
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
7
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
8
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
9
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
10
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
11
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
12
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
13
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
14
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
15
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
16
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
17
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
18
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
19
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
20
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या, मुलीच्या मदतीने गळा आवळून मारले, केला आत्महत्येचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 3:41 PM

Husband stabbed to death in immoral relationshi : - पाच दिवसानंतर झाली पोलखोल

नागपूर - अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची गळा आवळून हत्या करणाऱ्या महिलेला पारडी पोलिसांनी अटक केली. वडिलांची हत्या करण्यासाठी आरोपी महिलेला तिच्या मुलीनेही मदत केली, हे विशेष. 

धर्मेंद्र नरेश गजभिये (वय ४०) असे मृताचे नाव आहे. २० वर्षांपूर्वी त्याचे निशा (वय ३६) हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना १७ वर्षांची मुलगी आहे. गजभिये ट्रक ड्रायव्हर होता. त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते. तो वाहन घेऊन नेहमी बाहेरगावी जायचा. त्यामुळे पाच ते सात दिवसानंतर घरी परत यायचा. दरम्यान, त्याच्या पत्नीने दुसरीकडे सूत जुळविल्याचा संशय त्याला आला होता. त्यामुळे पाच वर्षांपासून त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. आपल्या मागे पत्नी भलतेच काम करते, असा संशय असल्याने गजभियेने घरी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले होते. त्यातील फुटेज तो नेहमी चेक करायचा अन् नंतर पती-पत्नीत कडाक्याचे भांडण व्हायचे. ११ एप्रिलच्या रात्री असेच झाले. पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. दोघांनीही एकमेकांना जबर मारहाण केली. यावेळी नशेत असलेल्या गजभियेवर पत्नी निशा हावी झाली. तिने मुलीच्या मदतीने खाली पाडले. त्याच्या छातीवर लाथ ठेवली अन् गळ्याभोवती ओढणीचा फास टाकला. एका बाजूने मुलगी अन् दुसऱ्या बाजूने निशाने हा फास आवळून गजभियेला ठार मारले. दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्येचा कांगावा केला. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि चाैकशी सुरू केली. दरम्यान, धर्मेंद्र गजभियेच्या भावाला संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पती-पत्नी आणि त्यांच्यातील वादाची माहिती सांगितली. १६ एप्रिलला डॉक्टरांनी पोलिसांना अहवाल दिला. त्यात गळा आवळल्याने गजभियेचा मृत्यू झाल्याचे नमूद केले. त्यावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी निशा आणि तिच्या मुलीला शनिवारी रात्री ताब्यात घेतले.

मुलीची सुधारगृहात रवानगी

मुलगी अल्पवयीन असल्याने पोलीस तिची सुधारगृहात रवानगी करणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात आणखी कुणाचा काही रोल आहे का, त्याचीही चाैकशी ठाणेदार कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रंजे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिस