दीर-नातेवाईकाने प्रत्येक दुसऱ्या रात्री केला रेप, पतीही बनला हैवान; महिलेची कहाणी ऐकून पोलिसही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:52 PM2022-05-20T12:52:46+5:302022-05-20T12:53:51+5:30
Madhya Pradesh Gang Rape : महिलेच्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. बदनामीच्या भीतीमुळे महिला इतके दिवस गप्प होती.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून एका महिलेसोबत तीन वर्षांपर्यंत गॅंगरेप (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोप आहे की, महिलेचा पती, तिचे दोन दीर आणि एका नातेवाईकाने प्रत्येक दुसऱ्या रात्री तिच्यासोबत रेप केला. महिलेच्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. बदनामीच्या भीतीमुळे महिला इतके दिवस गप्प होती.
सगळं काही सहस्य झाल्यावर महिलेने हिंमत करून तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितलं तर पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून महिलेच्या पतीसहीत दोन दीर आणि एका नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ग्वाल्हेरला राहणाऱ्या २६ वर्षीय तरूणीचा निकाह तीन वर्षाआधी झाला होता. आरोप आहे की, तीन महिन्यांनंतरच तिचा तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत होता. जेव्हा तिने विरोध केला तर त्याने तिला मारहाण केली होती. बदनामीच्या भीतीने महिला गप्प बसली तर आरोपींची हिंमत आणखीनच वाढली. एक वर्षाआधी हिंमत करून महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. याची माहिती मिळताच तिचा पती आणि दीर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. त्यांनी चुकीचं काही करणार नाही असं आश्वासन दिलं होतं.
यानंतर महिला पोलीस स्टेशनच्या गेटमधूनच परत आली होती. त्यानंतर तिचा पती तिला एका भाड्याच्या घरात घेऊन गेला. तिथे दोन दीर आणि पतीने त्याच रात्री नशेच्या स्थितीत तिच्यावर गॅंगरेप केला. त्यानंतर मंगळवारी पीडिता पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेचा पती, दीर आणि एका नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींचा शोध सुरू आहे त्यांना लवकरच अटक केली जाईल.