शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

5 मुलांची आई पडली प्रेमात, प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा; वाढदिवशी फोन केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 5:21 PM

मुन्ना साहची पत्नी 4 मुली आणि एका मुलासह भरवाडा टोल येथील तिच्या प्रियकराच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक महिन्यापासून राहत होती.

बिहारमधील दरभंगाच्या कमरौली गावात राम कुमार साह उर्फ ​​मुन्ना साह याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर मुन्ना साहची पत्नी संगीता देवी आणि तिचा प्रियकर कुंदनलाल दास यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता कमरौली कुंवरपट्टी भरवाडा टोलनाक्यावर घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

डीएसपी इमरान अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना साहची पत्नी 4 मुली आणि एका मुलासह भरवाडा टोल येथील तिच्या प्रियकराच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक महिन्यापासून राहत होती. घटनेच्या रात्री आरोपी महिलेने तिच्या पतीला प्रियकराच्या फार्महाऊसवर बोलावून घेतलं. एकुलता एक मुलगा माधव कुमारचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुन्ना साहने त्याच्या गावातील तरुण अनोज कामती याला सांगितले की, आपल्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी आहे. मला बाईकने फॉर्मवर घेऊन जा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना साह फार्महाऊसवर येताच कुंदनलाल दास आणि संगीता देवी यांनी मुन्ना साहला पकडलं आणि पोल्ट्री फार्मच्या खांबाला दोरीने बांधलं. यानंतर कुंदनलाल दासने मुन्ना साहच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. मुन्ना साहच्या उजव्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. मुन्ना बेशुद्ध पडल्यानंतर संगीता देवी आणि कुंदनलाल यांनी त्याला विटा आणि दगडांनी मारहाण केली.

घटनेचा व्हिडिओ पाहता संगीता देवी तिचा पती मुन्ना साह याला लाथा-बुक्क्यांनी आणि विटा आणि दगडांनी मारहाण करत असल्याचे समजते. मुन्ना शाहची आईही घटनास्थळी पोहोचली होती. तिने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याचे ऐकले नाही. मुन्ना साहला सतत मारहाण करत होते. अखेरीस पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलेल्या मारहाणीमुळे मुन्ना साहचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी