बलरामपूर (छत्तीसगड) - अनैतिक संबंधांचा शेवट हा अखेरीच वाईटच होत असतो. अशीच एक घटना छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात घडली आहे. येथील सनावल पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावामध्ये १७ जुलै रोजी झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांना पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आल्यानंतर केला आहे. (Husband was an obstacle in his illicit relationship with Brother-in-law, then his wife strangled him, a conspiracy to cover up the crime)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार या व्यक्तीची हत्या त्याच्या धाकट्या वहिनीच्या नातेवाईकांनी नव्हे तर त्याच्याच पत्नीने दोरीने गळा आवळून केली आहे. या महिलेने ही हत्या दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या मार्गामध्ये पती अडथळा बनत असल्याने केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पत्नीने इतरांना हत्येच्या प्रकरणात अडकवण्यासाठी हे कारस्थान रचले होते. मात्र पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यानंतर तीच या प्रकरणात अडकली.
आरोपी महिलेचे दोन वर्षांपासून तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध होते. १२ जुलै रोजी आरोपी महिला आणि दिराला अनैतिक संबंध ठेवताना दिराच्या पत्नीने पाहिले होते. त्यावरून त्या पती-पत्नीमध्ये खूप वाद झाला होता. त्यानंतर या महिलेने दिराच्या पत्नीने या प्रकरणाबाबत कुणाशी काही बोलू नये म्हणून एक कारस्थान रचले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेने तिच्या पतीला धमकावून मद्य प्राशन करायला लावले. त्यानंतर त्याला दिराच्या पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र पीडित महिलेने या घटनेमुळे धक्का बसल्याने थेट माहेर गाठले आणि नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीला बोलावून त्यांचा समाचार घेतला तसेच त्यांना मारहाणही केली.
त्यानंतर आरोपी महिलेने पतीला रुग्णालयात दाखल केले आणि नवे कारस्थान रचले. त्यानुसार तिने पतीची गळा आवळून हत्या केली आणि त्याचा आळ दीराच्या पत्नीच्या नातेवाईकांवर येईल अशी तजवीज केली. तसेच दिराच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आपल्या पतीला मारहाण करण्यात आली. त्यात गंभीर जखमी होऊन पतीचा मृत्यू झाला, असा दावा या महिलेने केला. मात्र पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे या महिलेचे सारे कारस्थान उघड झाले.
याबाबत पोलीस अधिकारी अमित बघेल यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तेव्हा या व्यक्तीचा मृत्यू हा मारहाणीमुळे नाही तर गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेची कसून चौकशी केली असता तिने पतीची हत्या केल्याचे कबुल केले.