मेरठमध्ये एका महिलेने तिच्या पतीला एका दुसऱ्याच महिलेसोबत पाहून रस्त्यावर त्याला मारझोड केल्याची घटना समोर आली आहे. सेंट्रल बाजारात पतीला एका दुसऱ्या महिलेसोबत फिरणं चांगलंच महागात पडलंय. अदनान नावाची व्यक्ती एक तरूणीसोबत मार्केट दिसला आणि इतक्याच आयशा नावाची महिला तिथे पोहोचली. ती अदनानची पत्नी असल्याचं तिने सांगितलं. आयशाने तिथेच जोरदार गोंधळ घातला आणि नंतर अदनान- आयशामध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांना मारलं.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. इथे दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप लावले. आयशा म्हणाली की, वर्षभरापूर्वी अदनान आणि आयशाचं लग्न झालं होतं. पण काही दिवसातच त्यांचं फारसं पटत नव्हतं. त्यानंतर अदनानने आयशाला माहेरी सोडलं. पण जेव्हा तिला समजलं की, पती दुसऱ्या महिलेसोबत बाजारात आहे तर ती तिथे पोहोचली. (हे पण वाचा : संतापजनक! जाडी अन् सावळी असल्याचं कारण देत पत्नीला सोडलं; गर्लफ्रेंडशी तुलना करत म्हणायचा.....)
आयशा म्हणाली की, अदनान त्या महिलेला घेऊन शोरूममध्ये गेला आणि बराच वेळ बाहेर आला नाही तर मीच तिथे गेले. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. अदनान म्हणाला की त्याने आयशाला घटस्फोट दिला आहे आणि केसही सुरू आहे. पण घटस्फोट अजून पूर्ण झाला नाही. अदनानने आरोप लावला आहे की, आयशाने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
तो त्याच्या एका मैत्रिणीसोबत बाजारात गेला तेव्हा तिथे आयशा काही लोकांसोबत पोहोचली. गैरवर्तन करू लागली. नंतर तिने मारहाण केली. आयशा म्हणाली की, तिचा घटस्फोट झालेला नाही आणि अदनान खोट्या पद्धतीने तिला घटस्फोट देत आहे. मी अजून पेपर साइन केलेले नाही. जर अदनानचं खरं असेल तर त्याने पेपर दाखवावे. (हे पण वाचा : क्रूरतेचा कळस! दारूसाठी पैसे न दिल्याने कापले पत्नीचे ओठ आणि नाक, घटनेने खळबळ)
दरम्यान सोशल वर्कर जूही या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी अदनानवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावर पोलिसांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये काही कारणाने वाद झाला. पती म्हणाला की, मी पत्नीला घटस्फोट दिलाय आणि कोर्टात केस आहे. पण अजून ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.