शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 5:40 AM

भिवंडीतील घटना : मृतदेहाच्या शर्टावरील टेलर मार्कवरून हत्येचा छडा

लाेकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने चार मुलांची आई असलेल्या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघड झाली आहे. गावठी औषध घेण्याच्या बहाण्याने आडवाटेवर जंगलात नेऊन पतीची हत्या घडवून आणली. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला. मात्र, शर्टावरील टेलर मार्कवरून मृतदेहाची ओळख पटवून पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सलाउद्दीन मोहम्मद युसूफ (वय ४२) असे मृताचे नाव आहे.

 भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत ४ जानेवारीला खारबाव रेल्वे स्टेशन परिसरातील जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या तसेच चेहरा विद्रूप केलेल्या अवस्थेत आढळला हाेता. गणेशपुरी विभाग पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांनी तपासाची सूत्रे हाती घेत मृतदेहाच्या शर्टावरील टेलर मार्कवरून भिवंडीतील टेलरचा शोध घेतला. हा टेलर बागे फिरदाेस येथे  आढळून आला. त्याच्या मदतीने शर्टाची व त्यानंतर मृतदेहाची ओळख पटून त्याचे नाव सलाउद्दीन असल्याचे निष्पन्न झाले. 

पाेलिसांनी त्याच्या नातेवाइकांचा शाेध घेतला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच इमारतीत राहणारा असजद अन्सारी (वय ३२) हा दफनविधीला उपस्थित नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे वळली. मात्र ताे आधीच पसार झाला हाेता. अखेर नारपोली परिसरातून त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दोन दिवसांत आरोपी गजाआडnअनैतिक संबंधातून ३८ वर्षीय  महिलेसाेबत कट रचून सलाउद्दीनची हत्या केल्याचे सांगितले. आराेपी महिलेने सलाउद्दीनला एका निर्जनस्थळी नेऊन तेथे आधीच हजर असलेल्या असजद याने धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला. nभिवंडी तालुका ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या दोन दिवसांत आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.