पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा 'सूड घेण्याचा प्लॅन', यूपीमध्ये लिहिली स्क्रिप्ट... मध्यप्रदेशात केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 01:26 PM2022-03-06T13:26:10+5:302022-03-06T14:02:45+5:30

Revenge Plan of Murder :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पत्नीसोबतचे प्रेमसंबंध हे खुनाचे कारण आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींची चौकशी सुरू आहे.

Husband's 'revenge plan' after wife's death, script written in UP ... Murder in Madhya Pradesh | पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा 'सूड घेण्याचा प्लॅन', यूपीमध्ये लिहिली स्क्रिप्ट... मध्यप्रदेशात केली हत्या

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा 'सूड घेण्याचा प्लॅन', यूपीमध्ये लिहिली स्क्रिप्ट... मध्यप्रदेशात केली हत्या

Next

सागर : मध्यप्रदेशातील सागर येथील गढ़पहरा किल्ल्यातील हत्येचे प्रकरण पोलिसांनी उकलले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पत्नीसोबतचे प्रेमसंबंध हे खुनाचे कारण आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींची चौकशी सुरू आहे.

सागरचे पोलीस अधीक्षक तरुण नायक यांनी सांगितले की, या हत्या प्रकरणातील आरोपी कपिल सेन, जो जाखोरा हॉल बसंत विहार येथील रहिवासी आहे आणि दुसरा आरोपी छोटू कुशवाह, जो कचनौंडा ललितपूर उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे एसपींनी सांगितले.

प्रेम प्रकरण हत्या

एसपीच्या म्हणण्यानुसार, आरोपी कपिलला त्याच्या पत्नीचे मृत राजूसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू झाली. दरम्यान, रोजच्या वादाला कंटाळून ऑगस्ट 2021 मध्ये कपिलच्या पत्नीने आत्महत्या केली होती. सततचे आजारपण हे आत्महत्येचे कारण असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

त्याचवेळी पत्नीच्या आत्महत्येनंतर कपिल राजूला मारण्याचा निर्णय घेतो. हत्येची स्क्रिप्ट लिहिली. त्याने त्याचा मित्र छोटू कुशवाह याला 20 हजार रुपये देण्याचे सांगून त्याबदल्यात त्याने राजूचा ठावठिकाणा मागितला. 20 हजारांच्या लोभापायी छोटूने होकार दिला.

खूप कंटाळलो आहे! बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाने उचलले टोकाचे पाऊल, WhatsAppवर पाठवली

भावोजीने मेव्हणीला १०० फूट खोल विहिरीत ढकललं; ३६ तास साप-विंचवांच्या विळख्यात होती तरुणी

यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघांनी हत्येसाठी दुसरे राज्य निवडले. त्यामुळेच राजूचा हत्येनंतर कोणाला ठावठिकाणा लागू नये म्हणून मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. तसेच हत्येच्या जंजाळातून आणि पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी देखील मदत होईल. या कटामुळे आरोपी छोटू कुशवाह हा राजूसोबत 27 फेब्रुवारी रोजी दुचाकीवरून गढ़पहरा मंदिरात पोहोचला आणि दर्शनानंतर त्याला मंदिरापासून दूर असलेल्या किल्ल्याच्या दिशेने घेऊन गेला. निर्जन ठिकाणचा फायदा घेत छोटूने डोक्यात दगड घालून राजूचा गळा आवळून खून केला.

Web Title: Husband's 'revenge plan' after wife's death, script written in UP ... Murder in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.