हैदराबाद : हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवरबलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून चार दिवसांनी तेलंगाना सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींनी माफीचा अर्ज केला आहे. यावर दिल्ली सरकारने हा अर्ज फेटाळून लावण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. तर तेलंगाना सरकारने घटनेच्या चार दिवसांत तीन पोलिसांना निलंबित करत बलात्कारचे खटले जलदगतीने चालविण्यासाठी न्यायालये उभारणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, एका मेकॅनिकने पहिला पुरावा पोलिसांना दिला होता. त्याच्या मदतीने पोलिसांनी वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर जात सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटविण्यात आली. यामुळेच पोलिसांना घटनेच्या 48 तासांत आरोपींना पकडण्याच यश आले. आरोपी मोहम्मद आरिफ, शिवा, नवीन आणि सी चेन्नकेवूल्लू यांनी बलात्कार करण्याआधी टोंडूपल्ली टोल प्लाझावर दारू प्यायली होती. सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री 9.30 वाजेपर्यंत ते दारू पित होते. महत्वाचे म्हणजे पिडीतेसाठी पसरवलेले जाळेच त्यांना तुरुंगात घेऊन गेले. टायर मॅकेनिकने पिडीतेचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांना सांगितले होते. पिडीतेच्या बहीणीने स्कूटरचा टायर पंक्चर झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. यामुळे पोलिसांनी टायर पंक्चर काढणाऱ्यांना शोधायला सुरूवात केली होती. यावेळी एका टायरवाल्याने पोलिसांना एक लाल स्कूटर आल्याचे सांगितले होते. तेथूनच आरोपींचा सुगावा लागला.
पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला होता. सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, '27 आणि 28 नोव्हेंबर दरम्यानच्या रात्री एक महिला बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात शमशाबाद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात विलंब झाल्याचा आरोप झाला होता. त्याची सखोल चौकशी केली. या प्रकरणी हलगर्जी झाल्याचं चौकशीतून आलं आहे. त्याआधारे उपनिरीक्षक एम. रवी कुमार, हेड कॉन्स्टेबल पी. वेणुगोपाल रेड्डी आणि ए. सत्यनारायण गौड यांना पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.'