शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नवा सायबर क्राइम: चालता-फिरता रेकॉर्ड करतात मुलींचे व्हिडिओ, Instagram वर अपलोड करत बदनामीचा 'उद्योग'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 7:01 PM

हैदराबादमध्ये इंस्टाग्राम अकाऊंटवर तरुणींचे आणि महिलांचे व्हिडिओ अपलोड करुन त्यांची बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हैदराबाद-हैदराबादमध्ये इंस्टाग्राम अकाऊंटवर तरुणींचे आणि महिलांचे व्हिडिओ अपलोड करुन त्यांची बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिसांच्या टीमची मदत घेतली जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. संबंधित इन्स्टाग्राम अकाऊंटच्या ऑपरेटरचा शोध घेऊन त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्राम पेज चालवणारी ही टोळी परिसरातील तरुणींना लक्ष्य करत आहे. तरुणी सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्यासोबत गप्पा मारत असतानाचे क्षण टोळीतील नराधम तरुण मोबाइल कॅमेरात कैद करतात. त्यानंतर संबंधित व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करुन अपमानजनक आणि आक्षेपार्ह कॅप्शनसह पोस्ट केले जात होते. या अकाऊंटचे जवळपास १४ हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स देखील आहेत. या पेजवर तरुणींचे व्हिडिओ आणि फोटो आक्षेपार्ह कॅप्शनसह अपलोड केले गेले आहेत. 

इतकंच नव्हे, तर तरुणींचे असेच व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्यांना पाठवण्याचं आवाहन देखील या टोळक्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केलं आहे. रस्त्यावर फिरताना, बागेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणचे तरुणींचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन आम्हाला पाठवा असं आवाहन या पेजवरुन करण्यात आलं आहे. या अकाऊंटवर अनेक आपत्तीजनक पोस्ट देखील आहे. ज्यात तरुणींची बदनामी करण्यात आली आहे. 

९०० हून अधिक लोक व्हिडिओ रेकॉर्ड करुन करतात अपलोडपोलिसांना अशीही माहिती मिळाली आहे की या अकाऊंटसाठी ९०० हून अधिक लोक व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि संबंधित इन्स्टाग्राम अकाऊंटला लिंक करतात. त्यामुळेच या अकाऊंटचे दिवसेंदिवस फॉलोअर्स देखील वाढत आहेत. पोलिसांकडे हे प्रकरण पोहोताच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. 

हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटप्रकरणात तीन गुन्ह्यांची नोंद केली आहे. पोलिसांनी कलम ५०६, ५०९, ३५४ (डी) आणि आयटी अधिनियम (६४) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. हैदराबाद सायबर क्राइम टीमनं इन्स्टाग्राम अकाऊंटच्या अॅडमिनची संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामCrime Newsगुन्हेगारी