हैदराबाद -हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे ५.३० वाजता एन्काऊंटर करण्यात आला आहे. या आरोपींची नावे मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु अशी होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपींना घटनास्थळी जिथे सामूहिक बलात्कार करण्यात आला तेथे नेले होते असल्याची माहिती सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली.
४ आणि ५ डिसेंबरला आरोपींची चौकशी करण्यात आली होती. चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर आरिफ आणि चिंताकुटा यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आरोपींनी दंडुके आणि दगडफेक करत पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोन आरोपींनी गोळ्या देखील झाडल्या. ही घटना सकाळी ५.४५ ते ६.१५ या दरम्यान घडली. आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवले जातील. आर्म्स अॅक्ट अंतर्गतही गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहिती सज्जनार यांनी दिली.
पीडित तरुणीचा फोन घटनास्थळाहून हस्तगतपोलिसांनी घटनास्थळाहून पीडित डॉक्टर तरुणीचा फोन हस्तगत केला आहे. मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु या चारही आरोपींना घटनाक्रम उलगडण्यासाठी घटनास्थळी घेऊन जाण्यात आले होते. घटनाक्रम जाणून घेणं हा पोलिसांचा उद्देश होता. जेणेकरून या प्रकरणाचा तपास करणं सोपं होईल.