संभळ - उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने गुन्हेगारांविषयी कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे गुंडांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
विशेषत: पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे गुंडांमध्ये एन्काऊंटर होण्याची भीती आहे. यामुळे आता उत्तर प्रदेशातील गुन्हेगार एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करीत आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही उत्तर प्रदेशात गुन्हेगारीच्या घटना कमी झाल्या नाहीत. परंतु कायदा व सुव्यवस्थेची भीती नक्कीच गुंडांच्या मनात निर्माण झाली आहे.
संभळ जिल्ह्यातही असेच एक प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एक गुन्हेगार स्वत:हून पोलिसांसमोर आत्मसमर्पण पोहोचला. विशेष म्हणजे, या गुन्हेगारांने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर एक चर्चेचा विषय बनला आहे. हा गुन्हेगार गळ्याला पाटी लटकवून आत्मसमर्पण करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात होता. त्यावेळी त्याच्याकडे पाहून लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना संभळ जिल्ह्यातील नाखासा पोलीस ठाण्याची आहे. या गुन्हेगारांवर १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे बोलले जात आहे. यामुळे तो खूप घाबरला होता. त्याला एन्काउंटरची भीती वाटत होती. त्यामुळेच त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा मार्ग निवडला.
मी चुकीचे काम केले आहे. मला संभळ पोलिसांची भीती वाटते. मी माझी चूक स्वीकारतो. अशा परिस्थितीत मी आत्मसमर्पण करत आहे. माझ्यावर गोळीबार करू नका, असे या गुन्हेगाराने आपल्या गळ्यात अडकविलेल्या पाटीवर लिहिले होते. दरम्यान, या गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
आणखी बातम्या...
- India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा
- Amazon चा सर्वात मोठा Great Indian Festival सेल; 70 टक्क्यांपर्यंत सवलत अन् आकर्षक ऑफर्स
- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा
- सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती
- "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"