शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

मी आयपीएस अधिकारी बोलतोय...तरुणीची फसवणूक करणारा तोतया पोलीस अधिकारी निर्भया पथकाच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 2:37 PM

Fake police Arrested : शहरातील मुलींनी अशा फसविणाऱ्या तरुणांपासून सावध रहा गरज पडल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधा असे आवाहन पो कर्मचारी कुसुम क्षीरसागर यांनी केले आहे.

पंढरपूर : मी आयपीएस अधिकारी बोलतोय... माझा मुलगा पीएसआय आहे... तुमच्या मुलीला पाहण्यासाठी मी येणार आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते येणार आहेत. तुम्ही घरातील सर्व तयारी पूर्ण करून ठेवा असे संभाषण करून एका तरूण मुलीस व तिच्या आईला फसवणाऱ्या एका तोतया पोलीस अधिकाऱ्याला पंढरपूर निर्भया पथकाने ताब्यात घेतले आहे.

एक तरुणी पोलीस भर्तीची तयारी करत होते. यामुळे ती रोज एका ठिकाणी धावण्यासाठी जात होती. ही माहिती काढत या तरुणीस रमेश सुरेश भोसले-भिसे (वय २२, रा. यल्लामा मंदिराजवळ, आंबे, ता. पंढरपूर, जिल्हा सोलापूर) जाणून बुजून धावताना धक्का दिला. या नंतर तो तिच्याशी बोलू लागला. मी पीएसआय अधिकारी असू मी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तुम्हाला भरती साठी मदत करतो. त्याचबरोबर माझे वडील आयपीएस अधिकारी आहेत. आमच्याकडे पंचतारांकित हॉटेल्स, शेती जमीन जुमला आहे असे सांगू लागला. त्यांचीही तुम्हाला पोलिस भर्तीसाठी मदत होईल.त्याकरणाने मुलीशी व तिच्या घरातील लोकांशी संपर्क वाढवला व वारंवार वेगवेगळया अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून मुलीला व तिच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले. त्यासाठी तो गेली सहामहीन्यापासुन पीडीत मुलगी व तिच्या आईच्या संपर्कात होता. 

एके दिवशी रमेशचा फोन लागत नसल्याने संबंधित मुलीने मंगळवेढा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. यावेळी रमेश भोसले या नावाचा त्या ठिकाणी कोणीही अधिकारी कार्यरत नसल्याची माहिती त्यांना मिळाली.

यानंतर त्या मुलीने पंढरपूर निर्भया पथकाचे संपर्क साधला. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाने निर्भया पथक प्रमुख प्रशांत भागवत, सहा.पेालीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, पोलीस कर्मचारी प्रसाद औटी, निलेश कांबळे, अरबाज खाटीक, निता डोकडे, कुसुम क्षिरसागर, अविनाश रोडगे यांनी सापळा रचून रमेश भोसले याला पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करायचा 

आपण खरोखरच पोलीस उपनिरीक्षक आहोत, हे भासविण्याठी पोलीस उपनिरीक्षक या पदाचा खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तोल इ. साहित्य सोलापूर येथून आणून पोलीस अधिकारी असल्याचे बनावट पोलीस ओळखपत्र व  बनावट आधारकार्ड देखील  तयार करुन घेवून त्याचा उपयोग रमेश भोसले याने मुलीची व तिचे घरातील लोकांची फसवणुक करण्यासाठी केला होता. तसेच तो  स्वतःचे वडील आयपीएस अधिकारी  म्हणून स्वतः फोन वरून मुलीच्या फोनवर फोन करत असल्याची माहिती निर्भया पथक प्रशांत भागवत यांनी सांगितली.

फसविणाऱ्या तरुणांपासून सावध रहाआपली पंचतारांकित हॉटेल्स आहेत. अनेक मोक्याच्या ठिकाणी जमिनी आहेत.  जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयजी यांच्याशी खास ओळख आहेत. त्याचबरोबर पंचतारांकित हॉटेल जमिनी आहेत. अशी खोटी माहिती मुलीच्या आईला सांगून तुमच्या मुलीशी लग्न करून द्या म्हणून रमेशने तगादा लावला होता. परंतु त्याचे भिंग उघडे पडले. शहरातील मुलींनी अशा फसविणाऱ्या तरुणांपासून सावध रहा गरज पडल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधा असे आवाहन पो कर्मचारी कुसुम क्षीरसागर यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPandharpurपंढरपूरArrestअटक