झाबुआ - मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी २५ वर्षीय एका डॉक्टरने आत्महत्या केली आहे. जेव्हा मुलीने तिच्या घरच्यांचा फोन उचलला नाही आणि घरमालक तिला पाहण्यासाठी खोलीजवळ गेला तेव्हा ही घटना उघडकीस आली. घरमालकाने मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत खोलीत लटकलेले पाहिले आणि पोलिसांना फोन केला.
घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेहाशेजारी सुसाईड नोट आढळली नाही. परंतु एक डायरी सापडली. त्या डायरीत काही संशयास्पद मजकूर लिहिण्यात आले होते. मी सुंदर दिसत नाही त्यामुळे युवतीच्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार आला होता. पोलिसांनी युवतीचा मृतदेह जप्त करत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. या प्रकरणी प्रत्येक अँगलचा पोलीस तपास करत आहेत.
युवतीच्या आत्महत्येची घटना काही दिवसांपूर्वी दिलीप गेट परिसरात घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात एका मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना एका खोलीत युवतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या मुलीचं नाव निशा गोयल असं आहे. तिचे वय २५ वर्षीय असून अलीकडेच तिची नियुक्ती जिल्हा रुग्णालयात झाली होती.
पोलिसांच्या हाती लागली डायरीपोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मुलीच्या खोलीची झडती घेतली असता तिथे कुठेही सुसाईड नोट सापडली नाही. पोलिसांच्या हाती एक डायरी लागल्याचे सांगण्यात येत आहे. ती सुंदर दिसत नाही असे या डायरीत लिहिले आहे. त्यामुळे अनेकवेळा आत्महत्येचा विचार मनात येतो. दरम्यान, लोकांनी पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी निशा दिवसभराची ड्युटी करून सायंकाळी पाच वाजता घरी आली. त्यानंतर ती बाहेर पडली नाही.
घरच्यांचा फोन निशाने उचलला नाहीघरमालकाने पोलिसांना सांगितले की, ९ मार्च रोजी त्याला निशाच्या कुटुंबीयांचा फोन आला. ते म्हणाले निशा फोन उचलत नाहीये, तुम्ही जाऊन बघा एकदा. मी आणि शेजाऱ्याने निशाचा दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर घरमालकाने खिडकीची काच फोडली असता निशा फासावर लटकल्याची दिसली.